शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक कामासाठी सोलापूर विभागातील तेराशे बस धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 13:04 IST

‘एसटी’चे वेळापत्रक कोलमडणार; पुणे, हैदराबादशिवाय अन्य गाड्या रद्द होण्याची शक्यता

ठळक मुद्देसोलापूर आगारातून जवळपास अडीचशे गाड्यांची मागणी  पुणे, हैदराबाद मार्ग सोडता सर्व गाड्या रद्द होण्याची शक्यता निवडणूक अधिकाºयांना केंद्रावर पोहोचवण्याची जबाबदारी ही एसटी प्रशासनावर

रुपेश हेळवे

सोलापूर : सध्या राज्यात विधानसभेचे वातावरण आहे़ यामध्ये सर्व प्रशासन कामाला लागले आहे़ निवडणुका सुरळीत व्हाव्यात यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस प्रशासन तर झटत आहेतच सोबतच निवडणूक अधिकाºयांना आपल्या केंद्रावर पोहोचवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी ही एसटी प्रशासनावर देण्यात आली आहे़ अनेक एसटी गाड्या या निवडणूक कामामध्ये गुंतल्या आहेत. यामुळे सोलापूर एसटी आगारामधील वेळापत्रक जवळपास कोलमडणार आहे.  पुणे, हैदराबाद मार्ग सोडता सर्व गाड्या रद्द होण्याची शक्यता आहे.

सोलापूर आगारातून आज शनिवार १९, रविवार २० आणि सोमवार २१ पर्यंत प्रत्येक दिवशी जवळपास अडीचशे गाड्यांची मागणी निवडणूक कामासाठी करण्यात आली आहे़ यामुळे याचा परिणाम प्रवासी मार्गावर होणार आहे़ आज शनिवार रोजी काहीअंशी परिणाम प्रवासी फेºयांवर होणार आहे़ पण रविवार आणि सोमवार मात्र जास्त प्रभाव पडणार आहे.

यामुळे पुणे, हैदराबाद मार्गावरील गाड्याच्या सुरळीत होणार आहेत़ याचबरोबर गाड्या जशा उपलब्ध होतील त्याप्रमाणे ग्रामीण मार्गावर धावतील़ सध्या सोलापूर आगारामध्ये जवळपास १३५ गाड्या आहेत आणि निवडणूक कामासाठी २५० गाड्यांची मागणी करण्यात आली आहे़ यामुळे इतर आगारातून गाड्यांची मागणी सोलापूर आगाराच्या वतीने करण्यात आली आहे.

कर्नाटक पोलिसांना आणण्यास बस रवाना - निवडणूक कामासाठी पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त इतर राज्यातून मागवण्यात येत आहे़ यामुळे सोलापुरात बंदोबस्तासाठी शेजारी असलेल्या कर्नाटक राज्यातून पोलिसांची कुमक मागवण्यात येत आह़े़ यामुळे कर्नाटक पोलिसांना आणण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या जिल्ह्यातून ४३ गाड्या रवाना झाल्या आहेत़ यामध्ये सोलापूर आगाराच्या ११ एसटी बससह ४३ बस गुरुवारी रात्री गेल्या आहेत़ 

- अनेक एसटी बस निवडणूक कामामुळे पाठवण्यात येणार आहेत. यामुळे रविवार आणि सोमवार रोजी गाड्यांची कमतरता असणार आहे़ यामुळे अनेक मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर पुणे आणि हैदराबाद मार्गावरील गाड्या सुरळीत चालतील व इतर मार्गावरील गाड्या मात्र विस्कळीत होणार आहेत, अशी माहिती स्थानकप्रमुख पी. हनगल यांनी दिली.

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकVotingमतदानBus Driverबसचालक