शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

नरभक्षक बिबट्याने घेतला तिसरा बळी; करमाळा परिसरातील दहशत कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 14:24 IST

करमाळा : चिखलठाण (ता. करमाळा ) येथे नरभक्षक बिबटयाने ऊसतोड करणा-या मजुराच्या  फुलाबाई इरचंद कोटली  (रा.दसाणे ता.साक्र जि.नंदुरबार) या नऊ ...

करमाळा : चिखलठाण (ता.करमाळा) येथे नरभक्षक बिबटयाने ऊसतोड करणा-या मजुराच्या  फुलाबाई इरचंद कोटली  (रा.दसाणे ता.साक्र जि.नंदुरबार) या नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर आज दुपारी ११.३० च्या सुमारास हल्ला करून तिला फरफटत घेऊन जात असताना ऊसतोड कामगारांनी बिबटयाचा पाठलाग केल्याने त्या मुलीस बिबटयाने जबडयातून सोडून ऊसाच्या फडात धूम ठोकली. गंभीर जखमी फुलाबाईला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले असता वैद्यकिय अधिका-याने मृत घोषीत केले आहे. नरभक्षक बिबटयाचा हा करमाळा तालुक्यातील तिसरा बळी आहे. 

चिखलठाण (ता.करमाळा) येथील राजेंद्र बळीराम बारकुंड यांच्या लांडाहिरा भागातील ऊस तोडणीचे काम बारामती अँग्रोची टोळी करत होती. ऊसाच्या फडात ऊसतोड मजुर तोडणी करत असताना मागे फडात खेळत असलेल्या फुलाबाईवर नरभक्षक बिबटयाने हल्ला करुन तिला जबडयात धरून फरफटत नेत असताना मुलीने आरडाओरड केली असता ऊसतोड मजुरांनी बिबटयाचा कोयत्याचा धाक दाखवून पाठलाग केला असता मुलीस बिबटयाने जबडयातुन सोडले. गंभीर जखमी फुलाबाईला उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी आणले असता उपचारापुर्वीच तिचे निधन झाल्याचे वैद्यकिय अधिकारी डाँ. अमोल डुकरे यांनी जाहीर केले. बिबटयाने करमाळा तालुक्यात दहशत माजवली असून नरभक्षक बिबटयास दिसताक्षणी गोळया घालण्याचे आदेश राज्याचे मुख्य वनसंरक्षक काकोडकर यांनी स्थानिक वन अधिका-यांना दिले आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरTigerवाघkarmala-acकरमाळा