शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
6
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
8
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
9
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
10
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
11
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
12
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
13
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
14
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
15
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
16
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
17
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
18
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
19
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
20
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?

ओळख लपविण्यासाठी चोरांना धर्म बदलला, ७३ ग्रॅम सोने जप्त, सोलापूर शहर गुन्हे शाखेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 14:15 IST

कोण कधी काय करेल हे कोणालाही सांगने कठीण आहे़ मात्र चोरी करण्यासाठी कोणी काही करेल हे मनात सुध्दा आणणे कठीण आहे़ मात्र सोलापूरात ओळख लपविण्यासाठी धर्म बदलुन घरफोडी करणाºया एका चोरट्यास गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले़

ठळक मुद्देही कारवाई सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने केली़ विठ्ठल चंद्रशेखर मादर उर्फ सध्या युसूफ चाँदसाब शेख (वय २८,रा. भारत नगर कुमठा नाका ) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव

अमित सोमवंशीसोलापूर दि १६ : कोण कधी काय करेल हे कोणालाही सांगने कठीण आहे़ मात्र चोरी करण्यासाठी कोणी काही करेल हे मनात सुध्दा आणणे कठीण आहे़ मात्र सोलापूरात ओळख लपविण्यासाठी धर्म बदलुन घरफोडी करणाºया एका चोरट्यास गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले़ शहरातील चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस आणले़ दरम्यान, त्याच्याकडून ७३ ग्रॅम सोन्यांचे दागिने जप्त केले़ ही कारवाई सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी केली़अट्टल गुन्हेगार विठ्ठल चंद्रशेखर मादर उर्फ सध्या युसूफ चाँदसाब शेख (वय २८,रा. भारत नगर कुमठा नाका ) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. शहर हद्दीतील मालाविषयी गुन्ह्यांना आळा घालणे व रेकार्डवरील आरोपीचा शोध घेऊन कारवाई करतांना गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक वैभव माळी व त्यांच्या पथकाला गुप्त बातमी दाराकडून माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेने अट्टल गुन्हेगार विठ्ठल यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने व त्याच्या साथीदाराने एमआयडीसी पोलीस ठाणे व विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीत चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून ७३ ग्रॅम वजनाचे सोन्यांचे दागिने जप्त केले. त्याची किमत १ लाख ८१ हजार २५० रुपये आहे. आरोपी विठ्ठल याच्या अन्य दोन साथीदारांचा शोध सुरु असल्याचे गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक वैभव माळी यांनी सांगितले.---------------दिवसा भंगरचा व्यवसाय अन रात्री चोरीआरोपी विठ्ठल याला २००८ साली विजापूर नाका पोलिसांनी एका गुन्ह्यात अटक केली होती. तो सराईत गुन्हेगार होता. तो मुळचा विजापूरचा रहिवाशी असून त्यांने मागील पाच वर्षाखाली त्याचे नाव बदलुन तो सोलापूरात राहुन भंगारचा व्यवसाय करायचा आणि रात्रीच्या वेळी    घरफोडया करत असल्याचे गुन्हे शाखेच्या वतीने सांगण्यात आले.-----------------यांनी केली कारवाईपोलीस आयुक्त महादेव तांबडे , पोलीस उपआयुक्त पौर्णिमा चौगुले, सहायक पोलीस आयुक्त शर्मिष्ठा वालावलकर, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुर्यंकात पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वैभव माळी, पोकॉ. सचिन बाबर, राजेश चव्हाण, नाना उबाळे, शितल शिवशरण, मंजुनाथ मुत्तनवार, सागर गुंड, दत्तात्रय कोळेकर, राजू राठोड, विजय निबांळकर आदींनी ही कारवाई केली.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस