शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर महापालिका भरविणार वृक्ष महोत्सव, मोफत दहा हजार रोपे वाटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 16:39 IST

अनोखा उपक्रम : पावसाळ्यात वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न

ठळक मुद्देराज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत महापालिका ३० हजार झाडे लावणारवन विभागाच्या नर्सरीतून दोन ते तीन फूट उंचीची दहा हजार झाडे घेण्यात आलीरामवाडी आणि परिसरात वृक्षांची लागवड करण्यात आली असून शहराच्या विविध भागात लावण्याचे काम सुरू होणार

सोलापूर : पावसाळ्यात वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेच्या वतीने आॅगस्टअखेर कृषी महोत्सवाच्या धर्तीवर वृक्ष महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवादरम्यान नागरिकांना दहा हजार रोपांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती उद्यान विभागप्रमुख निशिकांत कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत महापालिका ३० हजार झाडे लावणार आहे. वन विभागाच्या नर्सरीतून दोन ते तीन फूट उंचीची दहा हजार झाडे घेण्यात आली आहेत. रामवाडी आणि परिसरात वृक्षांची लागवड करण्यात आली असून शहराच्या विविध भागात लावण्याचे काम सुरू होणार आहे. याशिवाय उद्यान विभागाने आठ ते दहा फूट उंचीची आणखी १५ हजार झाडे खरेदीची निविदा काढली आहे. १५ आॅगस्टपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होईल. दरम्यान, शासनाने महापालिकांच्या स्तरांवर वृक्ष महोत्सव आयोजित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शहरात वृक्ष महोत्सव आयोजित करण्याचे नियोजन उद्यान विभागाने सुरू केले आहे. मनपाच्या जागेत हा महोत्सव होईल.

यात शहर आणि जिल्ह्यातील नर्सरीमधील रोपे  ठेवण्यात येणार आहेत. वृक्ष लागवड आणि संवर्धनाबाबत काम करणाºया संस्थांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांना मागणीनुसार आवश्यक ती रोपे अल्प दरात खरेदी करता येतील. या महोत्सवाचा प्रस्ताव मनपा आयुक्त दीपक तावरे यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. पर्यावरण प्रेमी व्यक्तींनी मनपाला दहा हजार रोपे मोफत देण्याची तयारी दाखविली आहे. ही रोपे नागरिकांना भेट देण्यात येणार आहेत. शहरातील इतर पर्यावरण प्रेमी संस्थांनी या मोहिमेत सहभागी व्हावे. उद्यान विभागाशी संपर्क करावा, असे आवाहन कांबळे यांनी केले आहे. 

शहराला हरित आच्छादित प्रदेश करा- उद्यान विभागप्रमुख निशिकांत कांबळे म्हणाले, नागरिकांनी झाडे लावताना संरक्षक भिंतीपासून चार फूट अंतरावर लावावीत. वाहतुकीला अडथळा होऊ नये, वीज वितरण तारांपासून ठराविक अंतर असावे याची काळजी घ्यावी. अंगणात झाड लावणार असाल तर कडूलिंब,  बकूळ, पिवळा चाफा, बहावा, हिरडा, केशर आंबा, जंगली आवळा आदी वृक्षांची लागवड करावी. यंदाच्या पावसाळ्यात जास्तीत जास्त वृक्षांची लागवड करुन सोलापूर शहराला हरित आच्छादित प्रदेश करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका