शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाच्या आरक्षणावर तोडगा निघणार; मुख्यमंत्र्यांनी उद्या बोलाविली मुंबईत बैठक

By appasaheb.patil | Updated: September 14, 2024 17:43 IST

पंढरपूर येथे सुरू असलेल्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. 

आप्पासाहेब पाटील, पंढरपूर : धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा या मागणीसाठी गेल्या सहा दिवसांपासून सकल धनगर समाजाच्या प्रतिनिधींचे टिळक स्मारक, पंढरपूर येथे आमरण उपोषण सुरू आहे. पंढरपूर येथे सुरू असलेल्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. 

 राज्य शासनाच्या शिष्टमंडळातून  उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी  उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा करून तब्येतीची विचारपूस केली.  यावेळी सकल धनगर समाजाच्या मागण्याबाबत उद्या १५ सप्टेंबर २०२४ रोजी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सकल धनगर समाजाच्या प्रतिनिधी सोबत बैठक घेणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी सांगितले.  

धनगर आरक्षण प्रकरणी आंदोलन सुरू झाल्यानंतर राज्य सरकारकडून यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी राज्य सरकारकडून वेळ देण्यात आला आहे. धनगर समाजाच्या तीव्र भावनांचा विचार करून तातडीची बैठक बोलवली आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गासोबत नोकरी आणि शिक्षणात आरक्षण द्या अशी मागणी आहे.

टॅग्स :Dhangar Reservationधनगर आरक्षणSolapurसोलापूरPandharpurपंढरपूर