शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

बागल गटाच्या रक्तात कदापिही गद्दारी नाही : रश्मी बागल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 10:46 IST

बागल गटाच्या वतीने करमाळ्यात राष्टÑवादी काँग्रेसचा मेळावा घेण्यात आला.

ठळक मुद्देमाढा लोकसभेसाठी संजय शिंदे यांचे नाव जाहीर करण्यापूर्वी शरद पवार यांनी बागल गटाला विश्वासात घेतले होते - रश्मी बागलमागच्या विधानसभा निवडणुकीत विरोधात लढलो असलो तरी यावेळी आपण प्रामाणिकपणे त्यांच्यासोबत आहोत - रश्मी बागल

करमाळा : तालुक्यात दोन्ही गटात पक्षासाठी समन्वयाची भूमिका आवश्यक आहे. गद्दारी ही बागल गटाच्या रक्तात नाही. प्रत्येक गावात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महत्त्व पटवून देत संजयमामा शिंदे यांचा प्रचार करणार आहेत. याआधी आपले मतभेद होते, पण पक्षासाठी एकत्र येऊन आपण शिंदे यांचे काम करणार असल्याचे बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांनी सांगितले.

बागल गटाच्या वतीने करमाळ्यात राष्टÑवादी काँग्रेसचा मेळावा घेण्यात आला. या बैठकीत त्या बोलत होत्या. रश्मी बागल म्हणाल्या, माढा लोकसभेसाठी संजय शिंदे यांचे नाव जाहीर करण्यापूर्वी शरद पवार यांनी बागल गटाला विश्वासात घेतले होते. मागच्या विधानसभा निवडणुकीत विरोधात लढलो असलो तरी यावेळी आपण प्रामाणिकपणे त्यांच्यासोबत आहोत.

सध्या भाजप-शिवसेना सत्तेच्या विरोधात तीव्र नाराजी आहे. लोकांना आता परिवर्तन हवे आहे. हेच परिवर्तन निवडणुकीत विजयासाठी उपयोगी होईल. विरोधकांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. जनतेत संभ्रम निर्माण करण्याचे काम करणाºयांना त्यांची जागा दाखवून शिंदे यांना बहुमताने विजयी करा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते दिग्विजय बागल, ज्येष्ठ नेते विलासराव घुमरे, बाजार समितीचे उपसभापती चिंतामणी जगताप, तालुकाध्यक्ष सतीश नीळ, शहराध्यक्ष अल्ताफ तांबोळी, बाळासाहेब पांढरे, महिला अध्यक्ष साधना खरात, प्रिया ठोंबरे, दत्ता गवळी, झेडपी सदस्य राणीताई वारे, युवराज रोकडे, विजय भगत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन रणजित शिंदे यांनी केले.

नाराजांची समजूत... 

संजयमामा शिंदे यांच्या विरोधात माढा तालुक्यातील ३६ गावांतून बागल गटात असलेले दत्ता गवळी, विजय भगत यांच्यासह अन्य कार्यकर्ते यांची संजयमामांविषयी असलेली नाराजी दूर करण्यासाठी रश्मी बागल यांनी बंद खोलीत तासभर नाराजांची समजूत काढली.   

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसvidhan sabhaविधानसभा