शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आरक्षणाची गरज नाही, व्यवस्थित पैशांचे नियाेजन केले पाहिजे : राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 05:32 IST

विधानसभेसाठी पंढरपूर, शिवडीची उमेदवारी जाहीर

साेलापूर : महाराष्ट्रात सगळ्या गाेष्टी मुबलक प्रमाणात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही. व्यवस्थित पैशांचे नियाेजन केले पाहिजे, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी साेमवारी मांडली.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली. पत्रकार परिषदेत ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात बाहेरच्या राज्यातील मुले येतात आणि आपल्या नाेकऱ्या बळकावतात. भूमिपुत्रांना चांगल्या नाेकऱ्या मिळायला हव्या.   खासगी संस्थांमध्ये किती मुलांना आरक्षण मिळेल, हे लक्षात घ्यावे. माथी भडकावण्यासाठी हे सर्व सुरू आहे. प्रत्येक समाजाने हे समजून घ्यावे. आपल्या राज्याचा सर्वाधिक पैसा बाहेरून येणाऱ्यांसाठी  खर्च हाेताेय. यावेळी मनसेकडून शिवडीतून बाळा नांदगावकर आणि पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.

हे पवारांना हवंय का?

महाराष्ट्राची परिस्थिती मणिपूर हाेऊ नये, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले हाेते. यावर ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राचा मणिपूर हाेण्यात शरद पवार यांनी याला हातभार लावला. महाराष्ट्राचा मणिपूर हाेऊ नये, याची काळजी पवार यांनी घेतली पाहिजे. त्यांना हवंय की नकाेय हे कळलं पाहिजे, असे ठाकरे म्हणाले.

माथी भडकावणारी वक्तव्ये करू नका : अशोक चव्हाण

नांदेड : गरीब, उपेक्षितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारने आरक्षण दिले आहे. त्यामुळे कुणीही माथी भडकावणारी वक्तव्ये करू नयेत, अशा शब्दांत खासदार अशोक चव्हाण यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. खासदार चव्हाण म्हणाले, राज ठाकरे यांच्या पक्षाची भूमिका वेगळी असू शकते; परंतु देशात आरक्षण टिकले पाहिजे, अशी भाजपची भूमिका आहे. कुणीही माथी भडकविण्याचे काम करू नये. सामाजिक सलोखा कायम राहिला पाहिजे. 

राज ठाकरे यांच्यावर कारवाई करा : आंबेडकर

अमरावती : राज ठाकरे यांना सरकारने मागे-पुढे न बघता आतमध्ये टाकले पाहिजे, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अमरावतीत केले. राज ठाकरे यांचे वक्तव्य समाज दुभंगण्याचे वक्तव्य आहे. समाज दुभंगला की देश दुभंगतो. त्यामुळे यूएपीए आणि राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आंबेडकर यांनी केली.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरे