शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील निर्बंध आणखी वाढवू मात्र सध्या लॉकडाऊनबाबत कोणताही विचार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 14:28 IST

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, रोज सहा ते सात हजार तपासण्या होतील

सोलापूर : कोरोना प्रतिबंधक उपाययोजना आणखीन कडक करण्यासाठी जिल्हा प्रशासन नियोजन करीत आहे. कारवाया आणखीन वाढवू. तसेच निर्बंधही आणखी वाढवू. सध्या लॉकडाऊनचा विचार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी लोकमतला दिली.

ॲक्टिव्ह रुग्ण शोधण्यासाठी रोज सहा ते सात हजार कोरोना टेस्ट करण्यात येणार असल्याचे शंभरकर यांनी सांगितले. राज्यात कोरोना कहर वाढतोय. तशीच परिस्थिती सोलापूर जिल्ह्यात आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू होईल की काय? अशी भीती नागरिकांमध्ये आहे. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील लॉकडाऊनबाबत इशारा दिला होता. त्यामुळे लॉकडाऊनच्या चर्चेला ऊत आला आहे. याबाबत जिल्हाधिकारी शंभरकर यांना विचारले असता त्यांनी सध्या लॉकडाऊनचा विचार नाही, असे स्पष्ट केले.

सोलापूर जिल्ह्यात ५७ हजार आरटी-पीसीआर व दीड लाख रॅपिड टेस्टच्या किट उपलब्ध आहेत. हे किमान महिनाभर पुरतील. कमी पडल्यास इतर जिल्ह्यातून तातडीने मागविता येतील. सध्या प्रती दिन ६ हजार जणांची तपासणी करण्यात येत आहे. अश्विनी रूग्णालयातील तपासणी मशीन सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला फक्त ९० तपासण्या होत होत्या, आता आपल्याकडे ६ ते ७ हजार तपासण्या केल्या जात असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले, मंगल कार्यालये, दुकाने सील करणे, नागरिकांवर कारवाई केली जात आहे. आतापर्यंत विविध माध्यमांतून ५ कोटी रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये. सॅनिटायझर्सचा वापर करावा, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा.

जिल्ह्यात ४ लाख को-मॉर्बिड रुग्ण

  • सोलापुरात एकूण ४ लाख १३ हजार को-मॉर्बिड रुग्ण आहेत. ४५ वर्षांवरील व यापुढील अधिकाधिक नागरिकांना तसेच को-मॉर्बिड रुग्णांना लस देण्यासाठी नियोजन सुरू आहे.
  • जिल्ह्यात ४०० प्राथमिक उपकेंद्र असून त्यापैकी ३०० प्राथमिक उपकेंद्रातून लसीकरण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या प्रतीदिन ६ ते ७ हजार जणांना लस दिली जात आहे. सध्या ३१ हजार लसीचे डोस असून आठवडाभर पुरतील. प्रशासनाकडून एक लाख लसीची मागणी नोंदविली असून दोन दिवसांत आणखी लस उपलब्ध होणार आहे.

 

 

----------पूर्ण------------

 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयcorona virusकोरोना वायरस बातम्या