शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरचे अधिकारी भारावले; वाराणसीच्या योगी पॅटर्नचा आधार आता पंढरीच्या वारीलाही मिळणार

By appasaheb.patil | Updated: August 29, 2022 11:06 IST

अधिकारी भारावले : ‘योगी मॉडेल’चा अभ्यास दौरा संपवून टीम परतली

आप्पासाहेब पाटीलसोलापूर : पंढरपूरच्या वारीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दर्शनसाठी येतात. यावेळी प्रशासन आणि राज्य सरकारी यंत्रणेवर मोठा भार असतो. व्यवस्थापन आणि सुरक्षा या दोन्हींसाठी कंबर कसून यंत्रणा कामाला लागलेली असते. त्यामुळेच, या यंत्रणांनी आता योगींच्या वाराणसी मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी वाराणसी गाठली आहे. वाराणसी येथील मंदिरासह विविध भागांची पाहणी करून सोलापूरचे पथक पुन्हा सोलापुरात दाखल झाले.  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांच्या मॉडेल पाहून सोलापूरची टीम भारावली. 

पंढरीच्या आषाढी एकादशी सोहळ्याची दखल केंद्र सरकारने घेतली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही महिन्यांपूर्वीच देहूला भेट देत पंढरीच्या वारीचं कौतुक केलं. त्यानंतरही पंढरपूर मंदिर व परिसराचा आराखडा करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. शासनाकडून त्याला हिरवा कंदिल मिळाल्यानंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या सूचनेवरून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पंढरपूरचे प्रांताधिकारी गजानन गुरव आणि सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे विशेष कार्य अधिकारी राजेश तितर, प्रांत अधिकारी गजानन गुरव, पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, दत्तात्रय गावडे, पंढरपूर मुख्याधिकारी अरविंद माळी हे योगी मॉडेलची पाहणी करून परतले. आता वाराणसीच्या धरतीवर पंढरपूर विकास आराखडा तयार होईल असे सांगण्यात आले.

पंढरपूर व वाराणसीच्या मंदिरात साम्य- वाराणसी येथील मंदिर व पंढरपूरचे श्री. विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात भरपूर साम्य आहे. आषाढी, कार्तिकी व अन्य वारीप्रमाणे तेथेही मोठया प्रमाणात यात्रा भरते. एवढेच नव्हे तर मंदिर व नदीचा भाग याचेही अंतर वाराणसीप्रमाणे पंढरपूरचेही आहे. त्यामुळे तेथील अभ्यास दौरा पंढरपूरच्या आराखड्यासाठी मोठया प्रमाणात मदत होईल असेही सांगण्यात आले.

पोलीस आयुक्तांनी केली मोठी मदत...- सोलापूरची टीम वाराणसीत दाखल झाल्यानंतर वाराणसीचे पोलीस आयुक्त ए. सतीश गणेश यांनी संपूर्ण टीमचं स्वागत केलं, तसेच, क्राउड मॅनेजमेंट सिस्टमवर आपलं प्रेझेंटेशनही मांडलं. त्यानंतर विविध विषयांवर चर्चा झाली. शिवाय सोलापूरच्या टीमला संपूर्णपणे सहकार्य करण्याचा विश्वास वाराणसी पोलिसांनी दिला. त्यानंतर सोलापूरच्या टीमने विचारलेल्या प्रश्नाला उत्तरे दिली.

क्राउड मॅनेजमेंट सिस्टमचा अभ्यासश्रावण महिना म्हणजे काशी-वारासणीत उत्सवांचा मेळा असतो. लाखो भाविक दाखल होतात. पंतप्रधानांचा मतदारसंघ असल्याने येथील यंत्रणाही सुपरफास्ट असते. येथील क्राउड मॅनेजमेंट सिस्टमची सध्या चर्चा आहे. या यंत्रणेचा अभ्यास सोलापूरच्या संपूर्ण टीमनं केल्याचे सांगण्यात आले. काशीतील क्राउड मॅनेजमेंट सिस्टमने सोलापूरच्या अधिकाऱ्यांनाही प्रभावित केलं आहे. त्यामुळेच, पंढरीच्या वारीचं क्राउड मॅनेजमेंट करण्याचे नियोजन टीमकडून करण्याचे आता नियोजन होईल, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले.

गर्दीवर नियंत्रण व कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी वाराणसी येथील दौरा केला. वाराणसी येथील मंदिर व पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात खुप साम्य आहे. त्यामुळे पोलिसांच्या दृष्टीने योग्य नियोजन करण्यासाठी हा अभ्यास दौरा निश्चितच उपयोगी पडेल. यासाठी जिल्हाधिकारी मार्गदर्शन करतील.- तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Wariपंढरपूर वारीVaranasiवाराणसी