शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सर्वधर्म समभाव हीच भारताची खरी ओळख! देशाला बलवान बनवण्यासाठी एकमेकांमध्ये प्रेम निर्माण करा - मुफ्ती सय्यद अहमद घोरी

By संताजी शिंदे | Updated: April 11, 2024 12:32 IST

Solapur News: सर्वधर्म समभाव हीच खरी भारताची ओळख असून, या देशाला जागतीक स्तरावर बलवान बनवण्यासाठी सर्वांमध्ये प्रेम व एकोपा असला पाहिजे असे मत, जाने निजामी हैद्राबाद येथील असोसिएट प्रोफेसर मुफ्ती सय्यद अहमद घोरी नक्स बंदी यांनी व्यक्त केले.

- संताजी शिंदे सोलापूर - भारत हा असा देश आहे, जेथे हिंदू, मुस्लिम, शिख, इसाई, बौद्ध यासह अन्य विविध धर्माचे लोक राहतात. सर्वधर्म समभाव हीच खरी भारताची ओळख असून, या देशाला जागतीक स्तरावर बलवान बनवण्यासाठी सर्वांमध्ये प्रेम व एकोपा असला पाहिजे असे मत, जाने निजामी हैद्राबाद येथील असोसिएट प्रोफेसर मुफ्ती सय्यद अहमद घोरी नक्स बंदी यांनी व्यक्त केले.

पानगल येथील शाही आलमगीर ईदगाह येथे रमजान ईद निमित्त आयोजित करण्यात आलेल्या नमाज पठणा दरम्यान ते बोलत होते. पानगलच्या मैदानावर सकाळी ८.३० वाजता नमाज पठण करण्यात आले. त्यानंतर ते समस्त हिंदू मुस्लिम बांधवांना उद्देशून बोलताना म्हणाले की, सर्व धर्मीय देशाची जी ओळख आहे ती कायम राहिली पाहिजे. सध्याच्या युगात शिक्षणाशिवाय विकास होणे शक्य नाही. जगातील प्रत्येक देशाने शिक्षणावर भर दिला आहे. आपल्या ज्येष्ठांचा सन्मान केला पाहिजे, वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे. सर्वांसोबत चांगले वागले पाहिजे.

सकाळी ८ वाजताच मैदानावर मुस्लिम बांधवांनी येण्यास सुरूवात केली. चटई, बेडशी खाली आंथरून नमाजाच्या स्थितीत बसत होते. ८.३० वाजता मुफ्ती सय्यद अहमद घोरी यांनी नमाजाला सुरूवात केली. पांढरे शुभ्र कपडे परिधान करून हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले.

पावसासाठी केली दुवा- नमाज पठना दरम्यान मुफ्ती सय्यद अहमद घेरी यांनी यंदाच्या वर्षी चांगला पाऊस पडू दे अशी याचना केली. आमच्याकडून काही पाप झाले असल्यास आम्हाला माफ कर, भारतामध्ये सुख समृद्धी निर्माण होऊ दे. शांतता नांदू ने अशी प्रार्थना केली. -  ईद हा शांतता व मानवतेचा संदेश देणारा सण असून हिंदू मुस्लिम बांधवांनी भाईचारा कायम ठेवत देशाच्या उज्वल भवितव्यासाठी एकत्र येण्याचे आवाहनही योळी केले.   

टॅग्स :Solapurसोलापूर