शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राचे प्लास्टिक बंदी पथक सोलापुरात आले; दोन दिवसांत १७० किलोच्या बॅगा केल्या जप्त

By appasaheb.patil | Updated: November 24, 2022 19:48 IST

केंद्राचे प्लास्टिक बंदी पथक सोलापुरात आले असून दोन दिवसांत १७० किलोच्या बॅगा केल्या जप्त केल्या आहेत. 

सोलापूर : प्लास्टिक बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी होत आहे की नाही याबाबतची पाहणी करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पथक दोन दिवस सोलापूर दौऱ्यावर होते. या पथकाने शहरातील दुकाने, बाजारपेठा, भाजी मार्केटची अचानक पाहणी केली. या पाहणीत या पथकाने १७० किलोचे प्लास्टिक जप्त करून १ लाख २८ हजारांचा दंड ठोठावला.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडील प्राप्त निर्देशानुसार सोलापूर महानगरपालिका परिसरात १ जुलै २००२ पासून सिंगल युज प्लास्टिक बंदी घालण्यात आली आहे. त्याची दैनंदिन आरोग्य निरीक्षक यांच्या माध्यमातून सर्व प्रभागात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने २१ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर २०२२ रोजी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्लास्टिक बंदी पथक पाहणीकरिता शहरात दाखल झाले असता घनकचरा व्यवस्थापन विभाग, पर्यावरण विभाग, सोमपा व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या साहाय्याने शहरातील मुख्य बाजारपेठा, भाजी मार्केट, फ्लॉवर मार्केट, होलसेल विक्रेते व प्लास्टिक कारखान्याची पाहणी करण्यात आली असता या पथकाकडून वापरण्यास बंदी असलेले एकूण १७० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून १ लाख २८ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यावेळी केंद्रीय पथकातील लोखंडे, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे पाटील, मनपाचे पर्यावरण व्यवस्थापक स्वप्निल सोलनकर, मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार आदी उपस्थित होते.

प्लास्टिक वापराल तर खबरदार...सोलापूर महानगरपालिकेच्या उपायुक्त यांनी शहरातील सर्व नागरिकांना आवाहन केले असून नागरिकांनी व व्यावसायिकांनी आपल्या दैनंदिन जीवनात शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिकचा वापर करणे थांबवून कापडी पिशवीचा वापर करावा. अन्यथा मोठ्या कारवाईला सामोरे जाल अशी तंबी महापालिकेच्यावतीने देण्यात आली.

  

 

टॅग्स :SolapurसोलापूरPlastic banप्लॅस्टिक बंदी