शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मंद्रुपच्या शेतकऱ्यांची जमीन अखेर एमआयडीसीतून मोकळी!

By संताजी शिंदे | Updated: March 24, 2023 19:09 IST

सहसचिवाचे पत्र : ५२९ हेक्टर क्षेत्र विनाअधिसूचित

सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील शेतकऱ्यांची जमीन अखेर नियोजित एमआयडीसीतून मोकळी झाली आहे. या बाबतचे पत्र उद्योग, उर्जा व कामगार विभागाचे सहसचिव संजय देगावकर यांनी काढले आहे. पत्रात ५२९.८०२ हेक्टर आर. विनाअधिसूचित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.  

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे नियोजित एमआयडीसीसाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी, विनासंमती संपादित होत होत्या. शेतजमिनींच्या सात-बारा उता-यांवर एमआयडीसीच्या नावाची नोंद झाली आहे. नोंदणीच्या विरोधात शेतकऱ्यांचे सहा महिन्यांपासून आंदोलन सुरू होते. मात्र शासनस्तरावर  दाखल घेतली जात नसल्यामुळे, संतप्त शेतकऱ्यांनी मंद्रूप ते सोलापूरमार्गे मुंबईला बैलगाडी मोर्चा काढला होता. १५ मार्च रोजी हा बोलगाडी मोर्चा सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर धाडकला. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी झालेली चर्चा फिसकटल्यामुळे आंदोलक शेतकऱ्यांनी बैलगाड्यांसह तेथेच दोन दिवसांची धरणे आंदोलन केले होते.

दोन दिवसांत न्याय न मिळाल्यास बैलागाडी मोर्चा पुढे मुंबईला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्याकडे रवाना होणार होता. आंदोलकांचे नेते महादेव गुरप्पा कुंभार यांनी जाहीर केले. दरम्यान, शासनाच्या उद्योग विभागाचे सहसचिव संजय देगावकर यांनी महादेव कुंभार यांना पत्र पाठवून उद्योगमंत्री उदय सावंत यांच्या आदेशानुसार मंद्रूप औद्योगिक क्षेत्राच्या विनाअधिसूचनेचा प्रस्ताव पुढील १५ दिवसांत उच्चाधिकार समितीच्या बैठकीसमोर सादर करून विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी शंभरकर यांनी आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा केली. परंतु ही चर्चा फिसकटली. तेव्हा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन सुरूच ठेवले आहे. शासनाच्या उद्योग विभागाचे सहसचिव संजय देगावकर यांनी शेतजमीन विनाअधिसूचित करण्यास मान्यता देण्यात आल्याचे पत्र पाठवले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरMIDCएमआयडीसी