शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

उन्ह तापू लागले...सोलापूरचा पारा ३७ अंशावर पोहोचला; रस्त्यावरही शुकशुकाट दिसू लागला

By appasaheb.patil | Updated: February 26, 2023 18:16 IST

सकाळी, रात्री थंडी अन् दिवसा कडक उन्ह 

सोलापूर : फेब्रुवारीच्या महिना अखेरीस सूर्य तापू लागला आहे. मागील आठवडयात ३६ अंशावर असलेले तापमान या आठवड्यात ३७ अंशावर पोहोचले आहे. सकाळी थंडी अन् दिवसा कडक उन्ह या दुहेरी हवामानाचा परिणामामुळे सोलापूरकरांच्या आराेग्यावर परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले. वाढत्या उन्हामुळे शहरातील बरेच रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. 

राज्यात सर्वत्र हवामान कोरडे असून अनेक शहरातील तापमानात मोठी वाढ होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोलापुरातील कमाल आणि किमान अशा दोन्ही तापमानात सातत्याने बदल होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. दिवसभराच्या उन्हाच्या झळांनंतरही रात्रीही हवेत चांगलाच गारठा जाणवत आहे. शिवाय उकाडाही वाढल्याचे बोलले जात आहे. रविवारी दिवसभर नागरिकांनी एसी आणि फॅनच्या हवेखाली आसरा घेतल्याचे दिसत होते. उकाड्यापासून सुटका करून घेण्यासाठी लिंबू पाण्याच्या गाड्यांवरही नागरिकांनी धाव घेतली.

मागील पाच दिवसातील तापमान

तारीख- कमाल - किमान

- २२ फेब्रुवारी - ३७.० - १८.०२

२३ फेब्रुवारी - ३७.०६ - १८.०२,

२३ फेब्रुवारी - ३७.०६ - १८.०२,

२४ फेब्रुवारी - ३७.०६ २०.०५,

२५ फेब्रुवारी - ३७.०२ - १८.०६,

२६ फेब्रुवारी - ३७.०० - १८.०७

आरोग्याची काळजी घ्या...

तापमानात वाढ होताना दिसत आहे. उकाड्याने नागरिकांच्या अंगाची लाही लाही होताना दिसत आहे. तापमानात वाढ झाल्याने नागरिकांना उन्हाच्या झळा बसताना दिसत आहे . त्यामुळे शरीरात उष्णतेचे प्रमाण वाढल्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे. चक्कर येणे, डोकेदुखी, त्वचेच्या विकारात उन्हाळ्यात वाढ होत भरपूर पाणी पिल्यास डिहायड्रेशनचे प्रमाण कमी होते . त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

टॅग्स :TemperatureतापमानSolapurसोलापूर