शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडी लग्नाला आले आणि आरोपी झाले; पंढरपूर तालुक्यात बालविवाह रोखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2022 09:05 IST

खर्डीतील घटना : बालविवाह लावणाऱ्या भडजी, फोटो काढणाऱ्या फोटोग्राफर वर गुन्हा दाखल

पंढरपूर : खर्डी (ता. पंढरपूर) येथे एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह झाला असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी भेट दिली होती. मात्र त्या पूर्वीच विवाह सोहळा उरकण्यात आला होता, यामुळे नवरदेव व त्याचे कुटुंब, अल्पवयीन मुलीचे कुटुंब, बालविवाह लावणारा भडजी व त्याचे फोटो काढणारा फोटोग्राफर, या लग्नासाठी आलेल्या व्हराडी या सर्वां विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खर्डी (ता. पंढरपूर) गावच्या हद्दीतील  एच.पी. पेट्रोल पंपाचे मागे चव्हाण मळा खर्डी ता पंढरपुर येथे बुधवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास बालविवाह झाला. याची माहिती मिळताच ग्रामविकास अधिकारी भगवान वसंतराव कुलकर्णी व पोहेकाॅ योगीराज खिलारे यांनी मौजे खर्डी ता पंढरपुर येथे एच पी पेट्रोल पंपा पाठीमागे चव्हाण मळा येथे पथकासह जावुन खात्री केली.

यावेळी वधु ही अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आलेवर वधुचे वडीलांना तिचे वयाबाबत चौकशी केल्यावर ते उडवाउडवीची उत्तरे देवु लागले. वधुचे जन्मातारखेचा दाखला प्राप्त करून खात्री केली असता वधुचे वय १४ वर्षे ०८ महिने असल्याचे निदर्शनास आले. यामुळे शासन बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ चे कलम १० प्रमाणे यातील अल्पवयीन मुलीचे नातेवाईक तसेच नवरदेवाचे नातेवाईक, फोटोग्राफर, लग्न लावणारे भटजी तसेच ग्रामपंचायत सदस्य व लग्नास उपस्थित असणारे सुमारे १०० ते २०० लोकांविरूध्द ग्रामविकास अधिकारी भगवान वसंतराव कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंढरपुर तालुका पोलीस ठाणेस गुन्हा नोंद करण्यात आला.

ही कामगिरी पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक मिलींद पाटील, स.पो.नि आदीनाथ खरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाॅ योगीराज खिलारे यांनी केली आहे. 

--------------------------पंढरपुर तालुका पोलीस ठाणे हदद्ीतील सर्व नागरीकांना पंढरपुर तालुका पोलीस ठाणेचे वतीने आवाहन करण्यात येते की आपले गावामध्ये होत असलेल्या बालविवाहाबाबत पोलीसांना माहीती देवुन बालविवाह रोखणेकरीता सहकार्य करावे. - : मिलिंद पाटील, पोलिस निरीक्षक, पंढरपूर

टॅग्स :Solapurसोलापूरmarriageलग्नPandharpurपंढरपूर