शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी

By आप्पासाहेब पाटील | Updated: November 22, 2025 17:48 IST

क्रुझर जीपचा टायर फुटल्याने अपघात झाला.

सोलापूर: देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या क्रुझर जीपला टायर फुटून देवदर्शनापूर्वीच झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर १२ जण जखमी झाले. ही दुर्घटना हैदराबाद रस्त्यावरील चिवरी फाट्याजवळ शनिवारी घडली. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. या अपघातातील जखमींना अधिक उपचारासाठी सोलापुरातील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय.

याबाबत मिळालेली थोडक्यात माहिती अशी की, दक्षिण सोलापूर तालुक्यातील ऊळेगाव येथील भाविक आणि त्यांचे पुणे येथील हडपसरचे नातेवाईक  देवदर्शनासाठी क्रुझर जीपने( एमएच २४/ व्ही ४९४८) नळदुर्गकडील खंडोबा मंदिराकडे निघाले होते.

कुणाल लक्ष्मण भिसे (वय- ३२ वर्षे), अंजली रवी अमराळे (वय- १५ वर्षे), आकाश दत्ता कदम (वय-२५ वर्षे, सर्व रा. हडपसर), ओमकार हरी शिंदे राहणार (वय -१० वर्ष), रुद्र हरी शिंदे (वय-१२वर्षे ), बालाजी पांडुरंग शिंदे ( वय - ४७ वर्ष, सर्व राहणार ऊळेगांव), माऊली कदम ( वय ३० वर्षे, रा. हडपसर), हरी बाळकृष्ण शिंदे( वय- ३६ वर्ष, राहणार-ऊळे), कार्तिक रवींद्र आमराळे ( वय -१३ वर्षे,) आणि  कार्तिकी रवींद्र आमराळे (वय- १५ वर्ष) आणि शिवांश माऊली कदम (वय- १ वर्षे, सर्व रा. हडपसर), श्लोक हरी शिंदे वय- ८ वर्ष, राहणार, ऊळे) अशी जखमींची नावे आहेत.

त्यांच्या जीपचे पुढील टायर अचानक फुटल्याने झालेल्या अपघातात तीन भाविकांचा मृत्यू झाला तर इतर १२ जण जखमी झाले. पुजा हरी शिंदे (वय- ३० वर्ष, राहणार-ऊळेगांव), सोनाली माऊली कदम (वय- २२ वर्ष, राहणार-हडपसर), साक्षी बडे वय १९ वर्षे, राहणार-हडपसर) अशी मृतांची नावे असल्याचंही सांगण्यात आलंय.

या अपघातास कारणीभूत ठरलेल्या क्रुझर जीपला अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने जीपचे टायर फुटल्याचं सांगण्यात आलंय. या सर्व जखमींना मदतनीस राजू वडवेराव आणि प्रहार संघटनेचे रुग्णसेवक मोहम्मद पठाण यांनी येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल केलंय.

English
हिंदी सारांश
Web Title : Solapur-Hyderabad Highway Accident: 3 Dead, 12 Injured Pilgrims

Web Summary : Three women died and twelve pilgrims were injured near Chivri Phata on the Solapur-Hyderabad highway when their jeep's tire burst. The group, traveling from Ulegaon and Hadapsar to Naldurg, met with the tragic accident before reaching their destination. Injured are in Solapur hospital.
टॅग्स :AccidentअपघातSolapurसोलापूर