शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चळे गावातील दहा युवा कार्यकर्ते बैलगाडीतून प्रवास करीत निघाले आंतरवाली सराटीला

By काशिनाथ वाघमारे | Updated: October 27, 2023 18:05 IST

शुक्रवार, दि. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता चळे येथील ग्रामपंचायत कार्यालयापासून त्यांचा प्रवास सुरू झाला.

सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी चळे (ता. पंढरपूर)तील मराठा समाजाचे दहा युवा कार्यकर्ते २५० किलोमीटर अंतर बैलगाडीतून प्रवास करीत निघाले आहेत.सुरेश औदुंबर मोरे, सिद्धनाथ वसंत खिलारे, पांडुरंग भारत खिलारे, दरलिंग गोरख मोरे, सुरेश कृष्णा मोरे, संतोष ज्ञानेश्वर मिसाळ, गणेश अंबादास कदम, तानाजी राजाराम घाडगे, बाबू चिंटू खिलारे आणि बिभीषण भानुदास मोरे हे दहा युवा कार्यकर्ते मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून शेतातील मजुरीची कामे बाजूला ठेवून आंतरवाली सराटीला निघाले.

शुक्रवार, दि. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता चळे येथील ग्रामपंचायत कार्यालयापासून त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर ते कोंढारकी, गोपाळपूरमार्गे पांडुरंगाचे दर्शन घेऊन त्यास साकडे घातले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुतळ्याचे दर्शन घेऊन तरुण मार्गस्थ झाले.यावेळी पंढरपूर बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड, उपसभापती राजू गावडे, संदीप मांडवे, दिलीप गुरव, माउली अटकळे, बाळासाहेब गायकवाड, गणेश मोरे, निखिल रोकडे, उदय पवार, बंडू मोरे, प्रताप गायकवाड, दीपक मोरे, सजन मोरे, बबलू मोरे, सुधाकर मोरे, निखिल खिलारे, प्रदीप मोरे, युवराज गायकवाड, धनाजी वाघ, बबलू वाघ आदी उपस्थित होते....अन्यथा आंतरवालीतून बैलगाड्या मुंबई मंत्रालयाकडे

उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाबाबत हे कार्यकर्ते चर्चा करणार आहेत. यादरम्यान मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास आंतरवाली येथून याच बैलगाड्यातून हे कार्यकर्ते मुंबई मंत्रालयाकडे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आठ ते दहा दिवसांत हे २५० किलोमीटर अंतर बैलगाडीतून प्रवास करीत कापणार आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील