शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

कामगार नेते श्रीशैल गायकवाडसह दहा जणांना पोलीसांचा बेदम चोप, सोलापूर महानगरपालिकेतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 12:31 IST

महापालिका आयुक्त ढाकणे यांच्या कार्यालयात घुसून जाळपोळीचा प्रयत्न करणाºया कामगार पुढारी श्रीशैल गायकवाड व त्याच्या दहा साथीदारांना पोलिसांनी बेदम चोप देत मंगळवारी सकाळी ताब्यात घेतले आहे़  या सर्वांची रवानगी सदर बाजार पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे़

ठळक मुद्देघंटागाडीवरील कर्मचाºयांना किमान वेतन द्यावं या मुद्यावरून गेले काही दिवस कामगार संघटना आणि पालिका प्रशासन यांच्यात चर्चाघंटागाडीवरील रोजंदारी कर्मचारी सध्या संपावरही आहेत या सर्व पार्श्वभूमीवर गेले काही दिवस आंदोलन सुरू महापालिकेतील वातावरण तणावपूर्ण बनले होते़ घटनेची माहिती समजताच वरिष्ठ पोलीस अधिकारी महापालिकेत पोहोचले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २ : महापालिका आयुक्त ढाकणे यांच्या कार्यालयात घुसून जाळपोळीचा प्रयत्न करणाºया कामगार पुढारी श्रीशैल गायकवाड व त्याच्या दहा साथीदारांना पोलिसांनी बेदम चोप देत मंगळवारी सकाळी ताब्यात घेतले आहे़  या सर्वांची रवानगी सदर बाजार पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे़घंटागाडीवरील कर्मचाºयांना किमान वेतन द्यावं या मुद्यावरून गेले काही दिवस कामगार संघटना आणि पालिका प्रशासन यांच्यात चर्चा वादविवाद सुरू आहेत़ घंटागाडीवरील रोजंदारी कर्मचारी सध्या संपावरही आहेत या सर्व पार्श्वभूमीवर गेले काही दिवस आंदोलन सुरू असताना  मंगळवारी या आंदोलनाला हिंसक वळण लावण्याचा प्रयत्न कामगार नेत्यांनी केला़ मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास श्रीशैल गायकवाड आणि त्यांच्या साथीदारांनी घोषणा देत सोलापूर महानगरपालिकेतील इंद्रभुवनातील आयुक्त अविनाश ढाकणे यांच्या कार्यालयाजवळ पोहोचले़ यातील दोघांनी काही कळण्यापूर्वीच अंगावर रॉकेल ओतून घेतले़ तर श्रीशैल गायकवाड व इतरांनी आयुक्तांच्या कार्यालयात घुसण्यासाठी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला़ यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करीत जमाव पांगवला़ आंदोलक घोषणा देऊ लागल्यावर पोलीसांना लाठीचार्जही करावा लागला़ यावेळी आयुक्त कार्यालयाच्या पोर्चमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाºयांशी हुज्जत घालणाºया श्रीशैल गायकवाड यांना पोलीसांना चांगलाच चोप दिला व सर्वांना ताब्यात घेऊन सदर बझार पोलीस ठाण्याकडे रवानगी केली़ या प्रकारामुळे महापालिकेतील वातावरण तणावपूर्ण बनले होते़ घटनेची माहिती समजताच वरिष्ठ पोलीस अधिकारी महापालिकेत पोहोचले होते़

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका