शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या दहा दिवसांच्या बाळंतिणीला ‘सिव्हिल’मध्ये बसविले दिवसभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 14:55 IST

सोलापूर शासकीय रूग्णालयातील अजब प्रकार; तब्बल साडेसहा तासांनंतर करून घेतले दाखल; महिलेचे झाले हाल !

ठळक मुद्देपाच्छा पेठेतील एक महिला प्रसूतीसाठी दि.२४ एप्रिल रोजी शासकीय रूग्णालयात दाखल झाली होतीप्रसूती झाल्यानंतर तिला दि.२८ एप्रिल रोजी डिस्चार्ज देण्यात आलामहिलेला सोडून चालक निघून गेला. मात्र तेथील डॉक्टरांनी महिलेला अ‍ॅडमिट करून घेण्यास नकार दिला

संताजी शिंदे सोलापूर : अवघ्या दहा दिवसांच्या बाळंतिणीला केगाव येथील क्वारंटाइन विभागात ठेवल्यानंतर तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शासकीय रूग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी आत घेण्यास नकार दिला, दिवसभर बाहेर बसविले. तब्बल साडेसहा तासांनंतर कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या बाळंतिणीला  आत घेऊन अ‍ॅडमिट केल्याचा धक्कादायक प्रकार  घडला.

पाच्छा पेठेतील एक महिला प्रसूतीसाठी दि.२४ एप्रिल रोजी शासकीय रूग्णालयात दाखल झाली होती़ त्या दिवशी तिला मुलगी झाली. प्रसूती झाल्यानंतर तिला दि.२८ एप्रिल रोजी डिस्चार्ज देण्यात आला. महिला घरी आली, मात्र तिच्या मोठ्या बहिणीला कोरोना पॉझिटिव्ह निघाला होता. त्यामुळे संपर्कातील नातेवाईकांमध्ये बाळंत झालेली महिला, तिचा पती, दीड वर्षाचा मुलगा व नुकतेच जन्मलेले पाच दिवसांचे बालक व दीर अशा पाच लोकांना अ‍ॅम्ब्युलन्समधून दि.१ मे २0२0 रोजी केगाव येथील क्वारंटाइन विभागाने नेले.

क्वारंटाइन विभागात सर्वांचे स्वॅब घेण्यात आले़ त्यांचा अहवाल दि.५ मे रोजी सकाळी प्राप्त झाला़ त्यात महिलेला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. अहवाल पाहताच बाळंत झालेल्या महिलेला सकाळी १0.३0 वाजता अ‍ॅम्ब्युलन्समधून शासकीय रूग्णालयात आणले. महिलेला सोडून चालक निघून गेला. मात्र तेथील डॉक्टरांनी महिलेला अ‍ॅडमिट करून घेण्यास नकार दिला. तुला इथे कोण आणले आहे, त्यांना येऊ दे, मग बघू, असे म्हणाले. महिलेला दहा दिवसांच्या बाळासह रूग्णालयातून बाहेर जाऊन बसण्यास सांगितले.

महिला व तिच्यासोबत १0 दिवसांचे बाळ, मोबाईल नाही, पती व दीड वर्षाचे मुल केगावच्या क्वारंटाइन विभागात, फोन कोणाला करावं कळेना. आपल्याला कोरोना झाला आहे, आता आपलं काय होणार? या भीतीने महिला ए-ब्लॉकसमोर असलेल्या दगडी भिंंतीच्या बाजूला दहा दिवसांच्या बाळाला पोटाला लावून बसली. जाणाºया-येणाºया व्यक्तीला मोबाईलसाठी विनंती करत होती. एका व्यक्तीने नातेवाईकाचा नंबर विचारला. नंबर डायल करून स्पीकर आॅनवर तिला नातेवाईकाला बोलण्यास दिले. संचारबंदीमुळे नातेवाईकांनाही रूग्णालयात येता येत नव्हते. दहा दिवसांच्या बाळंतिणीने  संपूर्ण दिवस भिंंतीच्या कडेला काढला.बाळंतिणीचे मामा रूग्णालयात आले, त्यांनी विचारणा केली तेव्हा कोणी प्रतिसाद देत नव्हते. मामाने रूग्णालयात गोंधळ घालण्यास सुरूवात केली तेव्हा त्यांना पोलिसांकडून काठीने झोडपण्यास सांगितले. तुझ्या नातेवाईकास घरी घेऊन जा, अशी उर्मट भाषा मामाला वापरण्यात आली.

महिलेला जाणीवपूर्वक लक्ष्य केले : फणीबंद- कोरोना विभागातील रूग्णांना देण्यात येणारे अन्न कोणत्या प्रतीचे आहे, हे मी दि.२ मे रोजी मीडियाच्या माध्यमातून दाखवले होते. बहुतेक याचा राग मनात धरून त्या महिलेला शासकीय रूग्णालयाच्या प्रशासनाने लक्ष्य केले आहे, असे मला वाटते. केगाव येथील डॉक्टरांनी ती महिला कोरोना पॉझिटिव्ह आहे असे सांगितले होते, तरीही तिच्यासोबत शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी असे वर्तन केले. तेथील डॉक्टराने आपले पितळ उघडे पडते म्हणून कोरोना पॉझिटिव्ह असलेली दहा दिवसांची बाळंतीण महिला पळून गेली, असा आरोप लावला. महिला कोरोना पॉझिटिव्ह असताना तिला बाहेर काढले, ही बाब किती गंभीर आहे. बाळंतीण महिला जर पळून गेली असती तर मग ती शासकीय रूग्णालयात रस्त्याच्या कडेला दहा दिवसांच्या बाळाला उघड्यावर घेऊन बसली असती का? असा सवाल बाबुलाल फणीबंद यांनी केला. 

रूग्ण दाखल झाल्यानंतर त्याची जी रितसर कार्यवाही असते ती पूर्ण झाली नसेल. त्यामुळे काही वेळ झाला असेल. या प्रकाराची मला कल्पना नाही. मात्र मी याची माहिती घेऊन काय झाले होते ते पाहतो. -डॉ. औदुंबर मस्के, अधीक्षक, शासकीय रुग्णालय.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटल