शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

करवसुली करा; अन्यथा घरी जा, सोमपा आयुक्त अविनाश ढाकणे यांची तंबी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 16:03 IST

महापालिकेची देणी ५०० कोटींपर्यंत आहेत. मिळकतकराची थकबाकी २५० कोटी, नवीन ड्रेनेज योजनेसाठी ४५ तर पाण्याच्या योजनेसाठी १५० कोटी आणि कर्मचाºयांची देणी देण्यासाठी ९४ कोटी हवे आहेत.

ठळक मुद्देसर्व कर्मचाºयांना मिळकतकर वसुलीच्या मोहिमेसाठी नेमलेजीएसटीचे अनुदान आल्याशिवाय कर्मचाºयांचा पगार होत नाही कर वसूल करा; अन्यथा हे काम जमत नसेल तर खुशाल राजीनामा देऊन घरी

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १३  :  महापालिकेची देणी ५०० कोटींपर्यंत आहेत. मिळकतकराची थकबाकी २५० कोटी, नवीन ड्रेनेज योजनेसाठी ४५ तर पाण्याच्या योजनेसाठी १५० कोटी आणि कर्मचाºयांची देणी देण्यासाठी ९४ कोटी हवे आहेत. ही कोटींची उड्डाणे पाहिली तरी जीएसटीचे अनुदान आल्याशिवाय कर्मचाºयांचा पगार होत नाही. त्यामुळे सर्व कर्मचाºयांना मिळकतकर वसुलीच्या मोहिमेसाठी नेमले आहे. कर वसूल करा; अन्यथा हे काम जमत नसेल तर खुशाल राजीनामा देऊन घरी जा, अशा शब्दात आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी मंगळवारी कर्मचाºयांना तंबी दिली. मिळकत कराच्या थकबाकी वसुलीसाठी मनपातर्फे १५ ते ३0 डिसेंबर या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. पाच प्रमुख विभागीय पथकांमध्ये २०८ कर्मचारी राहणार आहेत. हे कर्मचारी ५२ छोट्या गटांमार्फत झोनमध्ये विखुरले जाणार असून, थकबाकी असलेल्या प्रत्येक मिळकतदारापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या मोहिमेत थकबाकी न भरणाºयांचे नळकनेक्शन तोडणे व मिळकती सील, जप्ती करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. पथकात समाविष्ट केलेल्या कर्मचाºयांची सायंकाळी सभागृहात बैठक घेण्यात आली. बैठकीत आयुक्त डॉ. ढाकणे यांनी कर्मचाºयांना वसुलीबाबत मार्गदर्शन केले. नोटिसा देणे, जप्तीची कारवाई कशी करावी याबाबत मार्मिक सूचना दिल्या. त्याचबरोबर कर्मचाºयांना मनपाच्या ऐपतीबाबत जाणीव करून दिली. नेमून दिलेल्या कामात कुचराई करू नका. काम करायचे नसेल तर स्वेच्छानिवृत्ती घ्या, सर्व लाभ मिळतील. ऐतखाऊ कर्मचाºयांची यादी बनविण्याचे काम सुरू आहे. निलंबन करणे मलाही आवडत नाही. पण परिस्थितीच अशी आहे की इथे काम केल्याशिवाय आता दाम मिळणार नाही. कर्मचाºयांनी किती उद्दिष्ट पूर्ण केले याचा जानेवारीत आढावा घेतला जाईल. ज्यांचे काम समाधानकारक नाही त्यांच्या पर्यवेक्षकालाही जबाबदार धरले जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला. याप्रसंगी उपआयुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील, कर संकलन विभागप्रमुख आर. पी. गायकवाड, जोशी आदी उपस्थित होते. -------------------------दवाखाना पाहताना लाज वाटलीच्आयुक्त डॉ. ढाकणे यांनी मनपाचा कारभार सुधारला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करताना सोमवारी सायंकाळी बाईज हॉस्पिटलला दिलेल्या भेटीचा अनुभव सांगितला. हॉस्पिटलची व्यवस्था पाहून मला लाज वाटली. इमारतीवर झाड आले आहे आणि कर्मचारी २0 वर्षांपासून पत्रव्यवहार करीत बसले आहेत. कोणतीही समस्या छोटी असतानाच आपल्या पातळीवर सोडविण्याचा प्रयत्न करा. वसुली मोहिमेत मिळकतदाराच्या घरी गेल्यावर ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, मृत्यू झालेल्यांच्या ठिकाणांची दखल घ्या. तशी नोंद घ्या व वरिष्ठांना कळवा. आदेश आहे म्हणून आपल्याकडे भावना नाहीत असे वागू नका, असा सल्लाही त्यांनी दिला. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका