शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

चर्चा रंगली लंडनची.. दावा मात्र नवी दिल्लीतला, भालकेंचा फोटो व्हायरल शर्ट अन् पँटमधला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 12:29 IST

सोशल मीडियावर छायाचित्र झळकली; मंचरदेवी, रामदेवबाबा आश्रमासही दिल्या भेटी

ठळक मुद्देविठ्ठल सहकारी साखर कारखाना तसेच चेअरमन आ. भारत भालके हे सध्या विविध कारणांनी चर्चेतविठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम यंदा सुरू झालेला नाही़ तसेच कामगारांचा पगार थकीतआमदार भालके यांचा दिल्ली विमानतळावरील जीन्स पँट, फॉर्मल शर्टवरील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला

पंढरपूर : तालुक्यातील गुरसाळे येथील विठ्ठल कारखान्याचा प्रश्न लोंबकळत ठेवून आमदार भारत भालके लंडनला गेल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. मात्र आपण कारखान्याच्या कामासाठी दिल्लीत ठाम मांडून बसल्याचा दावा भारतनानांनी केला़ दरम्यान, या गदारोळात शर्ट आणि पँटमधील आमदाराचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आमदार भालके यांचा दिल्ली विमानतळावरील जीन्स पँट, फॉर्मल शर्टवरील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे़ यारून ते लंडनला गेल्याची चर्चा आहे़ प्रत्यक्षात ते दिल्ली येथे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भातील कामासाठी गेल्याचा दावा खुद्द भालके यांनी केला आहे.

विठ्ठल सहकारी साखर कारखाना तसेच चेअरमन आ. भारत भालके हे सध्या विविध कारणांनी चर्चेत आहेत. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम यंदा सुरू झालेला नाही़ तसेच कामगारांचा पगार थकीत आहे. बॅँकांकडून कर्ज मिळावे, यासाठी संचालक मंडळाकडून प्रयत्न सुरू आहेत. 

एनसीबीसीकडून कर्जाचे हप्ते वाढून मिळावेत, यासाठी चेअरमन आ. भारत भालके दिल्लीत गेले आहेत. पुढचे दोन ते तीन दिवस त्यांना त्याठिकाणी थांबावे लागत असल्याने त्यांनी मंचरदेवी तसेच रामदेवबाबा आश्रम या ठिकाणास भेट देऊन मुक्काम केला. 

यादरम्यान त्यांनी विमानतळावर जीन्स पँट व फॉरमल हाफ शर्ट घातल्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यापूर्वी १९८१ साली खा. शरद पवार यांच्यासोबतचा पँट, शर्ट घातलेला फोटो पाहायला मिळालेला होता. त्यानंतर प्रथमच सार्वजनिक ठिकाणी जीन्स पँट व हाफ शर्टमध्ये आ. भालके दिसून आल्याने हा फोटो ते लंडनमधील असल्याचे म्हणून व्हायरल झाला आहे. प्रत्यक्षात ते दिल्लीतच आहेत़ त्यांच्यासोबत शिवसेनेचे संजय कोकाटे हे सुद्धा आहेत.

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात आंदोलन करणाºयांकडून अशा प्रकारचे कृत्य करण्यात येत असल्याचा आरोप आ. भालके यांनी केला आहे. 

केवळ आफवा..विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कामानिमित्त मी दिल्लीत आलेलो आहे. तीन-चार दिवस याठिकाणी थांबावे लागत असल्याने मंचरदेवी व रामदेवबाबा आश्रमास भेट दिली. आमदार असल्याने २० हजार किमीचा विमान प्रवास मोफत आहे. मी लंडनला गेल्याच्या केवळ आफवा आहेत, असे विठ्ठल कारखाना चेअरमन आमदार भारत भालके यांनी सांगितले.

विठ्ठल सहकारी साखर कारखाना कामगारांच्या प्रश्नावर चेअरमन आ. भारत भालके व व्हा. चेअरमन लक्ष्मण पवार यांच्या दालनासमोर दोन तास धरणे आंदोलन केले. कामगारांच्या प्रश्नावर आपण खा. शरद पवार यांची बारामती येथे जाऊन भेट घेणार आहे़- अमरजीत पाटील, अध्यक्ष, कर्मवीर औदुंबरअण्णा पाटील प्रतिष्ठान

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरSharad Pawarशरद पवारSugar factoryसाखर कारखाने