शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाकाळात गणपतीची आरती करण्यापूर्वी या गोष्टीची घ्या खबरदारी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 12:54 IST

गणपतीच्या आरतीपूर्वी हात स्वच्छ करा; ज्वालाग्राही सॅनिटायझर ऐवजी साबण वापरा

ठळक मुद्देआरती करण्याआधी सॅनिटायझरचा वापर टाळण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले खिशामध्ये, परिसरात, मंडपात सॅनिटायझरची बाटली शक्यतो ठेवू नयेअल्कोहोल त्वचेवर असताना आग जवळ असल्यास तो पेट घेऊ शकतो

सोलापूर :  गणेशोत्सवात अनेक घरात दोन वेळा आरती केली जाते. आरती करत असताना प्रज्ज्वलित केलेले निरांजन अन् कापूर जवळ असतो. सध्याच्या कोरोनाच्या जमान्यात आरती करण्यापूर्वी हात स्वच्छ करायलाच हवा; पण  हाताला ज्वालाग्राही सॅनिटायझर लावला असल्यास तो पेट घेण्याची शक्यता आहे. यामुळे आरती करण्याआधी सॅनिटायझरचा वापर टाळण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे़ त्याऐवजी साबणाचा वापर करण्याचेही आवाहन केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक जण हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करत आहेत. कामानिमित्त घरातून बहेर पडणारे लोक तर नेहमीच स्वत:जवळ सॅनिटायझर बाळगतात. 

आपल्या हाताला संसर्ग झाल्याची शंका आली की लगेच सॅनिटायझर लावून हात स्वच्छ करतात. इतकेच नव्हे तर त्यांच्याशेजारी असलेले लोकही हात पुढे करून सॅनिटायझरचा वापर करतात.

गणपतीची आरती करताना दिवा प्रज्वलित केला जातो. आरती ओवाळताना हात आणि दिवा यामध्ये तसे जास्तीचे अंतर नसते. हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर घेताना चुकीने जास्तीचे सॅनिटायझर पडू शकते. तसेच हाताला असलेले सॅनिटायझर पूर्णपणे सुकत नाही. या परिस्थितीत दिवा जवळ असल्यास हात भाजण्याची शक्यता जास्त असते. कापराची आरती करताना देखील हात भाजण्याची शक्यता असते. शिवाय आरती झाल्यानंतर तेथे उपस्थित असलेले भाविक दिव्यावर हात धरून आरती घेतात. या स्थितीत सॅनिटायझर जर हाताला लावले तर आगीचा भडका उडू शकतो, असेही तज्ज्ञांनी सांगितले.

सॅनिटायझर पेट का घेतो? साधारणपणे सॅनिटायझरमध्ये ७० ते ७५ टक्के इथाईल अल्कोहोल, १० ते १५ टक्के ग्लिसरीन, एक ते पाच टक्के प्रोपिलीन ग्लायकोल, एक ते पाच टक्के ट्राई इथलोमाईन, पाच टक्के पाणी व सुवासिक रंग असतो. इथाईल अल्कोहोल हे ज्वलनशील असून सॅनिटायझरमध्ये तो अधिक प्रमाणात असतो. तसेच हर्बल सॅनिटायझरमध्येही अल्कोहोलचा वापर केलेला असतो. अल्कोहोल त्वचेवर असताना आग जवळ असल्यास तो पेट घेऊ शकतो. तसेच खिशामध्ये, परिसरात, मंडपात सॅनिटायझरची बाटली शक्यतो ठेवू नये, असे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भौतिकशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. विकास पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याGanpati Festivalगणेशोत्सव