शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात स्विपिंग मशीन रस्त्यावर; राेज रात्री हाेणार १२० किमी मार्गावर स्वच्छता

By solapurhyperlocal | Updated: April 8, 2022 15:37 IST

कामाला सुरुवात : फूटपाथवरील कचराही उचलणार

साेलापूर : शहरातील रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने स्वच्छता करण्यासाठी आलेली वाहने गुरुवारी अखेर रस्त्यावर कार्यरत झाली. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्या हस्ते या कामाचे उद्घाटन करण्यात आले. या मशीन राेज रात्री १० नंतर १२० किमी मुख्य रस्त्यांची स्वच्छता करणार आहेत.

महापालिकेने नवी दिल्ली येथील कंपनीला या कामाचा मक्ता दिला आहे. यासाठी प्रति रनिंग किलाेमीटर १,१५५ रुपये दर आकारण्यात आला आहे. हाेम मैदानाजवळील स्मार्ट राेडवर आयुक्त पी. शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखविला.

यावेळी मुख्य सफाई अधीक्षक अनिल चराटे, सफाई अधीक्षक एन.सी. बिराजदार, अन्वर शेख, आय.टी. बिराजदार, स्वप्नील साेनलकर, गिरीश तंबाके, तेजस शहा आदी उपस्थित हाेते. उद्घाटन कार्यक्रमानंतर मशीनव्दारे हाेम मैदान ते रंगभवन या रस्त्याच्या स्वच्छतेचे काम करण्यात आले. यानंतर रात्री इतर रस्त्यांचे काम करू असे सांगण्यात आले. सध्या तीन मशीन, दाेन जेटींग मशीन आहेत. रस्त्यांची स्वच्छता केल्यानंतर फूटपाथची स्वच्छता हाेणार आहे. या कामावर पालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग नियंत्रण ठेवणार असून दैनंदिन अहवाल घेण्यात येईल, असे उपायुक्त पांडे यांनी सांगितले.

--

असे कमी हाेतील धुळीचे थर

शहरातील रस्त्यांची अत्याधुनिक मशीनच्या साहाय्याने स्वच्छता झाल्यामुळे धूलीकणांचे प्रमाण कमी हाेईल. यातून प्रदूषणाची पातळी कमी करण्याचा प्रयत्न आहे. राेड स्विपिंग मशीनची स्वच्छतेची पहिली फेरी झाल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी किती प्रमाणात धूळ स्वच्छ झाली याची माहिती दिली. एका रस्त्यावरील धुळीचे थर कमी करण्यासाठी कमीत कमी १५ दिवस लागतील. टप्प्याटप्प्याने रस्ते धूळमुक्त हाेतील.

- धनराज पांडे, उपायुक्त, मनपा.

--

नागरिकांमधून स्वागत आणि सल्लेही

पालिकेने यापूर्वी रस्ते सफाईसाठी घेतलेली मशीन भंगारात निघाली. त्यामुळे नव्या मशीनबद्दल लाेकांना काैतुक नव्हते. गुरुवारी नव्या कामाचे व्हिडिओ साेशल मीडियावर अपलाेड झाले. त्यावेळी लाेकांनी स्वागत केले. शहरात नवे काहीतरी हाेतेय याचे स्वागत करू. पण, कामात सातत्य राहावे. मागील मशीन भंगारात काढल्या तसे काही हाेऊ नये असे सल्ले देण्यात आले.

---

 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाCleaning tipsस्वच्छता टिप्स