शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

भाजी विक्रेत्या आई-बाबांच्या कष्टाचं चीज; मुलगी ४९२ रँकने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण

By शीतलकुमार कांबळे | Updated: April 17, 2024 18:28 IST

आपल्या आई-बाबांचं कष्टाचं चीज मुलीने यूपीएससी उत्तीर्ण होऊन केलं. स्वाती राठोड असे या मुलीचे नाव असून ४९२ वी रँक घेत तिने हे मोठे यश मिळविले.

सोलापूर : सुरुवातीला मुंबईत मजुरी त्यानंतर सोलापुरात गाड्यावर भाजी विक्री केली. सतत कष्ट उपसत मुलांना शिकवले. आपल्या आई-बाबांचं कष्टाचं चीज मुलीने यूपीएससी उत्तीर्ण होऊन केलं. स्वाती राठोड असे या मुलीचे नाव असून ४९२ वी रँक घेत तिने हे मोठे यश मिळविले.

स्वाती मोहन राठोड हिचे आई-वडील हे विजापूर रोड, राजस्व नगर येथे राहतात. याच परिसरात आई-वडील दोघे मिळून भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. वडील भाजीचा गाडा घेऊन परिसरात भाजी विकत फिरतात. या व्यवसायाला आईचीही मदत असते. आपल्या आई-बाबांचे कष्ट पाहून मी यूपीएससी उत्तीर्ण होईनच अशी जिद्द बाळगत स्वातीने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. पाचव्या प्रयत्नात तिला हे यश मिळाले.

स्वाती राठोड हिचे दहावीपर्यंतचे शिक्षण नवी मुंबईतील वाशी येथे झाले. तिथे तिचे वडील मजुरी करत होते. त्यानंतर राठोड कुटुंबीय सोलापुरात स्थायिक झाले. तेव्हापासून ते भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. या दरम्यान स्वातीने भारती विद्यापीठ येते अकरावी, बारावीचे शिक्षण घेतले. वसुंधरा महाविद्यालयात बीए पूर्ण केले. सध्या भूगोल विषयातून ती एम.ए. करत आहे. तिला एक भाऊ असून दोन बहिणी आहेत.

यूपीएससी परीक्षेसाठी मी स्वत: अभ्यास केला, तर फक्त ऑप्शनल विषयासाठी क्लास लावला होता. सिनिअरनी सांगितलेले पुस्तके अभ्यासासाठी वापरले, प्रश्नपत्रिका सोडविल्या. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणे हे माझे स्वप्न पूर्ण झाल्याने आनंद होत आहे. मागील काही निकाल पाहता मला आयएएसची पोस्टिंग मिळेल अशी अपेक्षा आहे.- स्वाती राठोड, यूपीएससी उत्तीर्ण, विद्यार्थिनी

टॅग्स :Solapurसोलापूरupscकेंद्रीय लोकसेवा आयोग