शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तीन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा, पालकमंत्री हटवा- प्रभाकर देशमुखांची मागणी

By काशिनाथ वाघमारे | Updated: March 17, 2023 17:38 IST

कल्याणशेट्टींना वगळून पालकमंत्री करा, आझाद मैदानावर आंदोलनाचा इशारा

काशिनाथ वाघमारे, सोलापूर: आपणावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. शेतकरी संघटनेच्या चळवळीला दाबण्यासाठी कट रचून गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी तीन पोलीस अधिका-यांना निलंबीत करुन त्यांची चौकशी करा, पालकमंत्र्यांना हटवा, सचिन कल्याणशेट्टी यांना वगळून जिल्ह्यातील भाजप सेनेच्या इतर आमदारांस पालकमंत्री करा अशी मागणी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी  केली, अन्यथा आझाद मैदानावर आंदोलन करु असा इशारा पत्रकार परिषदेत दिला.

मागण्यांचे निवेदन घेऊन पालकमंत्र्यांना भेटायला निघालेल्या जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली सदर बझार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणात त्यांची आणि कार्यकर्त्यांची जामीनावर मुक्तता झाली. त्यानंतर शुक्रवारी प्रभाकर देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत स्वत:ची बाजू मांडत अन्याय झाल्याचे म्हणाले. शेतकरी संघटनेचे निवेदन पालकमंत्री घेत नाहीत. ते पद, सत्तेचा गैरवापर करत आहेत. ते परजिल्ह्याचे आहेत. त्यांचा राजीनामा घेऊन हाकालपट्टी करावी, संबंधीत तीन पोलीस अधिका-यांना निलंबीत करुन चौकशी करावी, सचिन कल्याणशेट्टी यांना वगळून सोलापूर जिल्ह्यातील भाजप-सेनेच्या कोणत्याही आमदाराला पालकमंत्रीपद द्यावे, चार छावणीची प्रलंबीत बिले द्यावीत अशी मागणी केली.

आगामी विधानसभेत कल्याणशेट्टी आमदार नसतील

गुन्हे दाखल होण्यापूर्वी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पोलिसांना जनहितच्या कार्यकर्त्यांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यास सांगितल्याचा आरोप प्रभाकर देशमुख यांनी केला. ज्या शेतक-यांनी कल्याणशेट्टींना निवडूण दिले त्या आमदारांनी असे वागणे बरे नव्हे. अगामी विधानसभेत ते आमदार म्हणून दिसणार नाहीत, मी त्यांना आव्हान देतोय असेही देशमुख म्हणाले.

टॅग्स :Solapurसोलापूर