शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

सुशीलकुमार शिंदेंची डाव्या-उजव्यांशी टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 08:04 IST

१३ उमेदवार रिंगणात । आंबेडकरांच्या आक्रमक भूमिकेने भाजप नेते लागले कामाला

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, भाजपचे डॉ. जयसिद्धेश्वर महाराज, वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर अशी तिरंगी लढत होत आहे. या प्रमुख उमेदवारांसह एकूण १३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

सोलापूरचा विद्यमान खासदार भाजपचा आहे; मात्र लढतीच्या केंद्रस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हेच आहेत. यंदा त्यांच्या विरोधात उजव्या आणि डाव्या शक्ती उभ्या ठाकल्या आहेत. त्यामुळे शिंदेंच्या टीकेचा रोख भाजप आणि प्रकाश आंबेडकर यांच्यावरही आहे. भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर महाराज असले तरीे सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

आंबेडकरांच्या एंट्रीनंतर दोन देशमुखांनी सुस्कारा सोडला होता. पण प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी आंबेडकरी विचारांच्या सर्व संघटना एक झाल्या. काँग्रेस आणि भाजपतील काही नगरसेवक वंचित आघाडीच्या प्रचारात सक्रिय झाले. माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी आंबेडकरांना पाठिंबा दिला. मुस्लीम आणि धनगर नेते वंचित आघाडीच्या प्रचारात सक्रिय झाल्याने भाजप नेतेही चक्रावले आहेत. मतविभाजनाचा फटका कोणाला बसणार याकडे लक्ष आहे.सोलापूरच्या विकासासाठी एनटीपीसी, सीमा सुरक्षा बलाचे प्रशिक्षण केंद्र यासारखे प्रकल्प आणले. सोलापूर विद्यापीठ, बोरामणी विमानतळ, पुणे-सोलापूर राष्ष्टÑीय महामार्ग चौपदरीकरणाची कामे करुन घेतली; मात्र गेल्या पाच वर्षांत सोलापूरच्या विकासासाठी प्रयत्न झाले नाहीत.- सुशीलकुमार शिंदे,काँग्रेसमी यापूर्वी धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात काम केले आहे. आता सोलापूरचा पाणी प्रश्न, रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, येथील विमानसेवा सुरू करण्याबरोबरच शहरात उद्योगधंदे यावेत यासाठी मी प्रयत्न करणार आहे. अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात कौशल्य विकास कार्यक्रम राबविणार.- डॉ. जयसिद्धेश्वर महाराज,भाजपसुशीलकुमार शिंदे आणि भाजपच्या वादात सोलापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य माणूस विकासापासून वंचित राहिला. येथील वंचित बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडी काम करणार. पाणी, रोजगारापासून वंचित असलेल्या घटकांसाठी काम करणार.- अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरवंचित बहुजन आघाडीप्रमुख उमेदवारसुशीलकुमार शिंदे । काँग्रेसडॉ. जयसिद्धेश्वर महाराज। भाजपअ‍ॅड. प्रकाश आंबेडकर । वंचित आघाडीकळीचे मुद्दे : शहराचा पाणी प्रश्न, शहरातील वाढती बेरोजगारी, विमानसेवेच्या थापा, रेल्वे मार्गाचे संथगतीने होणारे विद्युतीकरण, सोलापूर-हैदराबाद रस्त्याचे रखडलेले काम. 

टॅग्स :Sushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेSharad Pawarशरद पवारSolapurसोलापूर