शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

सुशीलकुमार शिंदेंचा खर्च ४३ लाख तर जयसिद्धेश्वरांचा २६ लाखांचा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 2:05 PM

सतराव्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या सूक्ष्म खर्चावरही निवडणूक विभागाची नजर; ७0 लाखांच्या आतच करावा लागणार प्रचाराचा खर्च

ठळक मुद्देकेंद्रीय निवडणूक आयोगाच्या व्हीसीसाठी उमेदवारांचा आतापर्यंत झालेल्या खर्चाचा ताळेबंद निवडणूक विभागाने बनवलाछाया नोंदवहीनुसार आघाडीच्या उमेदवाराचा खर्च सर्वाधिक ४३ लाख  ३0 हजार रुपये झाला आहे तर युतीच्या उमेदवाराचा खर्च त्या खालोखाल २६ लाख ६३ हजार रुपये झाला खर्चाच्या बाबतीत वंचित बहुजन आघाडीही मागे नसून, त्यांचा खर्च हा १९  लाख ६ हजार रुपयांच्या घरात गेला आहे

संतोष आचलारे 

सोलापूर: सतराव्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या सूक्ष्म खर्चावरही निवडणूक विभागाची नजर असून, येत्या दोन दिवसात होत असलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या व्हीसीसाठी उमेदवारांचा आतापर्यंत झालेल्या खर्चाचा ताळेबंद निवडणूक विभागाने बनवला आहे. छाया नोंदवहीनुसार आघाडीच्या उमेदवाराचा खर्च सर्वाधिक ४३ लाख  ३0 हजार रुपये झाला आहे तर युतीच्या उमेदवाराचा खर्च त्या खालोखाल २६ लाख ६३ हजार रुपये झाला आहे. दरम्यान, खर्चाच्या बाबतीत वंचित बहुजन आघाडीही मागे नसून, त्यांचा खर्च हा १९  लाख ६ हजार रुपयांच्या घरात गेला आहे.

दुसरीकडे उमेदवारांनी सादर केलेला खर्च हा छाया नोंदवहीतील नोंदीच्या तुलनेत जवळपास निम्मा आहे; मात्र उमेदवारांचा वाहनावरील खर्च तथा अन्य तत्सम खर्च निवडणूक विभागाने नोंदवल्यामुळे छाया  नोंदवही आणि प्रत्यक्ष उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चाच्या नोंदीत तफावत आहे; मात्र अंतिम खर्च    सादर करताना छोट्या-मोठ्या खर्चासोबतच सूक्ष्म खर्चाचा विचार करून त्यांचा मेळ घालण्यात येईल, असे निवडणूक विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी २०१४ प्रमाणेच यंदाही ७० लाखांची खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये उमेदवारंना १० हजार रुपयापर्यंतचा खर्च रोखीने करण्यास संमती देण्यात आली आहे. 

यापेक्षा  होणारा अधिकचा आर्थिक व्यवहार हा उमेदवारांना रोखीने करता येणार नसल्याचे निवडणूक आयोगाने बजावले आहे. दरम्यान, ५ एप्रिल, ८ एप्रिल या २ तारखांना निवडणूक रिंगणात उभ्या असलेल्या १३ उमेदवारांना त्यांचा खर्च सादर करण्याबाबत निर्देशित करण्यात आले होते. 

आता पुन्हा उर्वरित खर्च उमेदवारंना सादर करण्याबाबत सांगण्यात आले आहे. १८ एप्रिल रोजी मतदान झाल्यानंतर निर्धारित कालमर्यादेत निवडणूक रिंगणातील उमेदवारांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष खर्चाचे प्रतिज्ञापत्रही खर्च निरीक्षकांना सादर करावे  लागणार आहे. त्यानंतर निवडणूक  खर्च निरीक्षक त्यांच्या खर्चाची  तपासणी करतील. 

अपक्षाला नोटीसनिवडणुकीसंदर्भात खर्च सादर करण्यासंदर्भातील दोन बैठकांना उपस्थित नसलेल्या आणि सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिणेकडील राज्याचा रहिवासी असलेल्या एका उमेदवाराला जिल्हा निवडणूक विभागाने  त्यांनी त्यांचा खर्च  सादर न केल्याप्रकरणी नोटीस बजावली असल्याची माहिती आहे.

वाहनांवरील खर्च जादाउमेदवारांचा प्रामुख्याने वाहनावरील खर्च तूर्तास जादा असल्याचे निवडणूक विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले आहे. निवडणुकीमधील तुल्यबळ प्रतिस्पर्धी असलेले युतीचे उमेदवार जयसिध्देश्वर महाराज  यांच्या प्रचारासाठी , आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी  आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारासाठी रोज वाहनांची संख्या वाढतच आहे. पक्ष स्तरवरूननही प्रचार वाहन लावण्यात आले आहेत.

गतवेळी ९० लाखांचा खर्च२०१४ च्या निवडणुकीमध्ये रिंगणामध्ये १६ उमेदवार होते. या १६ उमेदवारांचा निवडणुकीच्या १८ दिवसांच्या कालावधीमधील खर्च हा एकत्रितरित्या ९० लाख रुपये झाला होता. यात युतीच्या उमेदवाराचा ३० लाख तर आघाडीच्या उमेदवाराचा ४४ लाख रुपये खर्च झाला होता. दहा उमेदवारांचा खर्च हा एक लाख रुपयांच्या आत होता.

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग