शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

सुशीलकुमारांच्या  ‘दगडू’ तर जयसिध्देश्वरांच्या ‘नुरंदय्या’ नावाला आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 13:54 IST

जिल्हाधिकाºयांनी आक्षेप फेटाळत मंजूर केले अर्ज; अपक्ष उमेदवार प्रमोद गायकवाड जाणार न्यायालयात

ठळक मुद्देसोलापूर लोकसभा मतदार संघातून काँग्रेस आघाडीतर्फे दाखल केलेल्या माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उमेदवारी अर्जाला अपक्ष उमेदवार प्रमोद गायकवाड यांनी आक्षेप घेतला.भाजपाचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा जातीचा दाखला व  नावाबाबत गायकवाड यांनी आक्षेप घेतला.

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या ‘दगडू’ तर भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या ‘नुरंदय्या’ नावाला अपक्ष उमेदवारांनी आक्षेप घेतला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी हे आक्षेप फेटाळून लावत उमेदवारी अर्ज मंजूर केले.

सोलापूर लोकसभा मतदार संघातून काँग्रेस आघाडीतर्फे दाखल केलेल्या माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उमेदवारी अर्जाला अपक्ष उमेदवार प्रमोद गायकवाड यांनी आक्षेप घेतला. सुशीलकुमार यांचे खरे नाव दगडू शंभू शिंदे हे आहे, पण उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी सुशीलकुमार संभाजीराव शिंदे असा उल्लेख केलेला आहे. त्यावर जिल्हाधिकाºयांनी नावात बदल केल्याबाबत सोबत गॅझेट जोडल्याचे सांगितले. त्यावर पुन्हा गायकवाड यांनी शिंदे यांच्या वयाबाबत आक्षेप घेतला. त्यांचे वय ७५ असताना ७९ नमूद केले आहे. तसेच मतदार यादीत सुशीलकुमार संभाजी शिंदे असे नाव असताना उमेदवारी अर्जावर वडिलांच्या नावात ‘राव’ जोडलेले आहे. मतदार यादीप्रमाणे नाव आहे़ वयाच्या अडचणीबाबत याक्षणी संबंध येत नाही, असा युक्तीवाद शिंदे यांचे वकील अमित आळंगे, प्रचारप्रमुख माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांनी केला़ हा युक्तीवाद मान्य करीत जिल्हाधिकाºयांनी आक्षेप फेटाळून लावला.

भाजपाचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा जातीचा दाखला व  नावाबाबत गायकवाड यांनी आक्षेप घेतला. जयसिद्धेश्वर यांचे मूळ नाव नुरंदय्या गुरूबसय्या हिरेमठ असे आहे, तसेच ते बेडा जंगम नसून हिंदू लिंगायत आहेत, असा दावा करीत पुराव्यादाखल शाळा सोडल्याचा दाखला सादर केला. त्यावर अ‍ॅड. संतोष न्हावकर यांनी नावातील बदल केलेले पुरावे व जातपडताळणीचे दाखले हजर केले. त्यावरून जिल्हाधिकाºयांनी गायकवाड यांचे आक्षेप फेटाळत उमेदवारी अर्ज मंजूर केला. याबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. भाजपातर्फे कोणत्याही उमेदवाराबाबत आक्षेप घेण्यात आलेला नाही अशी माहिती जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी दिली. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय