शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

शिरापूर सिंचन योजनेतील दलाली बंद झाल्याने विरोधकांकडून आरडाओरड : सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 10:45 IST

सोलापूर : पेरल तेच उगवत असतंय, उत्तर सोलापूर तालुक्यात तेच झालंय. आघाडी सरकारने १५ वर्षांत शिरापूर उपसा सिंचनला निधी ...

ठळक मुद्देशासकीय योजनांचा निधी व साहित्य वाटप कार्यक्रमात भाजप नेत्यांकडून जोरदार टीकाडॉ. शामाप्रसाद मुखर्जी योजनेतून ६२६ लाभार्थ्यांना गॅस, ८७० कामगारांना अनुदान,मुलींना सायकली, शिलाई मशीन,शेतकºयांना ताडपत्री व ट्रॅक्टरचे वाटप शिवसेना-भाजपा युतीच्या कालावधीत मंजूर झालेली शिरापूर उपसा सिंचन योजना आम्हीच पूर्ण करु - सुभाष देशमुख

सोलापूर: पेरल तेच उगवत असतंय, उत्तर सोलापूर तालुक्यात तेच झालंय. आघाडी सरकारने १५ वर्षांत शिरापूर उपसा सिंचनला निधी दिला नसल्याने शेतीला पाणी मिळालं नाही; मात्र शिवसेना-भाजपा युतीच्या कालावधीत मंजूर झालेली शिरापूर उपसा सिंचन योजना आम्हीच पूर्ण करु. योजनेच्या माध्यमातून मिळणारी दलाली बंद झाल्याने विरोधक ओरडत असल्याचा आरोपही सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी केला.

विविध शासकीय योजनेतून मंजूर निधी व साहित्य वाटपाचा कार्यक्रम मार्डी येथे सोमवारी झाला. त्यावेळी देशमुख बोलत होते. शिरापूर उपसा सिंचना पूर्ण करून पाणी द्या अशी मागणी  भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार व तालुकाध्यक्ष काशिनाथ कदम यांनी केली होती. तोच धागा पकडून सहकार मंत्री सुभाष देशमुख म्हणाले की, जे पेरल तेच उगवतं, उत्तर तालुक्यातही असेच झाले आहे. भ्रष्टाचारी माणसं सत्तेत पेरली त्यामुळे भ्रष्टाचार फोफावला. असल्याचे सहकार मंत्री म्हणाले. आघाडी सरकारने १५ वर्षांत निधी दिला होता का? बेइमान माणसं एकत्रित येऊन राजावर टीका करीत असताना  आपला राजा प्रामाणिक आहे हे ओळखावे असे आवाहन खासदार अमर साबळे यावेळी बोलताना उपस्थितांना केले.

शासनाने अनेक योजना सुरू केल्या असून त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यशाळा घेण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले. देशाचे तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांनी वरुन एक रुपया पाठविला तर १० पैसे खाली पोहोचतात असे सांगितले होते; मात्र सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आॅनलाईन पद्धती सुरू केल्याने पाठविलेला एक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतो असे भाजपा जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले.

यावेळी सभापती संध्याराणी पवार, काशिनाथ कदम यांचीही भाषणे झाली. डॉ. शामाप्रसाद मुखर्जी योजनेतून ६२६ लाभार्थ्यांना गॅस, ८७० कामगारांना अनुदान,मुलींना सायकली, शिलाई मशीन,शेतकºयांना ताडपत्री व ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, राज्य बँकेचे संचालक अविनाथ महागावकर, बाजार समितीचे संचालक अशोक निंबर्गी, श्रीमंत बंडगर, मार्कंडेय रुग्णालयाचे संचालक शशी थोरात, सरपंच शोभा गुंड, कौशल्या सुतार, राधाबाई गाडेकर, वैशाली गरड, संजय भोसले,पूर्वा वाघमारे, चंद्रप्रभा भास्कर, लिंबाजी जाधव यांचा सन्मान करण्यात आला. 

कार्यक्रमाला  इंद्रजित पवार, शिवाजी सोनार, संभाजी भडकुंबे, कुमार बिंगारे, युवराज पवार,  वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याण साबळे, उपसभापती रजनी भडकुंबे, गटविकास अधिकारी रंजना कांबळे,सरपंच अविनाश मार्तंडे, संभाजी दडे, जयश्री चौगुले, कमलाकर माने, अंबीर बोंगे, विशाल कदम, सईद शेख आदी उपस्थित होते.  

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुखWaterपाणीgovernment schemeसरकारी योजनाSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय