शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मुंडन करून जरांगे-पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा

By दिपक दुपारगुडे | Updated: September 12, 2023 17:45 IST

मराठा समाजाला कुणबी मराठा आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली-सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ भोसे येथे उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांना मुंडन करून पाठिंबा दिला.

सोलापूर  : सकल मराठा समाजाला कुणबी मराठा आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली-सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ भोसे येथे उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांना मुंडन करून पाठिंबा दिला. शिवाय विविध ग्रामपंचायतीने ठराव करून पाठिंबा दर्शविला आहे.

मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला १४ दिवसांचा कालावधी लोटला तरी अद्याप आरक्षणाचा मार्ग मोकळा होत नसल्याने शासनाच्या धोरणाचा विविध स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. दिवसेंदिवस आंदोलनाची धार अधिक तीव्र होत आहे. विविध सामाजिक संघटना, ग्रामपंचायती, आजी-माजी पदाधिकारी, उपोषणकर्ते चांगदेव तळेकर, नितीन तळेकर, सचिन भिंगारे आणि युवराज घाटे यांची भेटी घेऊन पाठिंबा देत आहेत.

भोसे, नेमतवाडी, नेवरे, पांढरेवाडीच्या कार्यकर्त्यांनी केले मुंडनमनोज जरांगे-पाटील यांच्या लढ्याच्या समर्थनार्थ भोसे येथील उपोषणकर्त्यांना पुरुषोत्तम तळेकर, अमोल तळेकर, शहाजी कोरके, पांडुरंग सुरवसे, माउली कोरके, शिवाजी कोरके, पोपट सावंत, बबलू गायकवाड, राम कोरके, बुवा गावंधरे, प्रकाश आदमिले, महावीर घोडके, धनाजी चव्हाण आणि नीलेश कदम यांनी मुंडन करून समर्थन केले. उपोषणाला वाढता पाठिंबा भोसे येथील उपोषणकर्त्यांना करकंबचे ॲड. शरद पांढरे, संभाजी ब्रिगेडचे अमोल शेळके, ग्रा. पं. सदस्य विवेक शिंगटे, समाधान गुंड, तुषार खाडे यांच्यासह संभाजी ब्रिगेड, प्रहार संघटना, शिवशंभू संघटना, बार्डी, जाधववाडी, पांढरेवाडी, सुगाव-भोसे यांच्यासह माढा तालुक्यातील तंबावे आणि परिते ग्रामपंचायतीने ठराव करून पाठिंबा जाहीर केला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरMaratha Reservationमराठा आरक्षण