शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; मीठापासून तयार केलेल्या बोगस रासायनिक खताचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 13:05 IST

लॉकडाऊनमध्ये सोलापूर जिल्ह्यात घुसवले बोगस खत; कोल्हापूरची टोळीचा करमाळा पोलिसांनी केला पर्दाफाश

ठळक मुद्देकरमाळा व माढा हे धरणाजवळचे तालुके निवडून या परिसरातील दुकानांना बोगस खताचा पुरवठाज्या कंपनीच्या नावे हे पोटॅश खत पुरविले त्या कंपनीने ९ महिन्यांपासून उत्पादन केलेले नव्हतेपिशवीवरील तारखेवरून कृषी विभागाला संशय वाटल्याने तपास केल्यावर ही बाब समोर आली

राजकुमार सारोळे

सोलापूर : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर घोषित केलेल्या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेला सूट मिळाल्याचा फायदा उचलत मीठापासून तयार केलेल्या बोगस रासायनिक खताचा पुरवठा करणाºया कोल्हापूरच्या टोळीचा करमाळा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. 

 बनावट रासायनिक खत तयार करणाºया टोळीचा म्होरक्या मोहन सुतार (रा. कागल, जि. कोल्हापूर) याला पोलिसांनी अटक करून कोल्हापुरातील खत तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे गोदाम व पिशव्याची छपाई करणारी मशीन जप्त केली आहे. या प्रकरणाचा आणखी तपास सुरू आहे. पण खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकºयांकडून होणाºया खताच्या खरेदीचा फायदा उचलत या टोळीने चक्क एका नामांकित कंपनीच्या नावाच्या पिशव्याची नक्कल करून छपाई केली.

करमाळा व माढा हे धरणाजवळचे तालुके निवडून या परिसरातील दुकानांना बोगस खताचा पुरवठा केला. पण या टोळीने ज्या कंपनीच्या नावे हे पोटॅश खत पुरविले त्या कंपनीने ९ महिन्यांपासून उत्पादन केलेले नव्हते. त्यामुळे पिशवीवरील तारखेवरून कृषी विभागाला संशय वाटल्याने तपास केल्यावर ही बाब समोर आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी या टोळीचा पर्दाफाश केला असून, आणखी धागेदोरे हाती येणार आहेत. 

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी कृषी विभागातर्फे बियाणे व खत पुरवठ्याची तयारी केली जाते. याप्रमाणे कृषी विभागाचे नियोजन सुरू असतानाच करमाळा तालुक्यात बोगस खत आल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली. गुण नियंत्रण विभागाचे अधिकारी सागर बारवकर यांच्या मदतीने कृषी विभागाचे सहायक संचालक रवींद्र माने यांनी कृषी सहायकाच्या मदतीने परिसरात सापळा लावला. त्यावेळी एका शेतकºयाकडे झुआरीच्या पोटॅश खताच्या दोन गोण्या मिळाल्या. त्यातील खत तपासले असता, मीठ असल्याचे दिसून आले. त्या शेतकºयाने खत कोठून घेतले याची चौकशी करून दुकानदारांकडून खत पुरविणारा एजंट अक्षय काशीद याला विश्वासात घेतल्यावर ही बाब उघड झाली. गुन्हा दाखल झाल्यावर बोगस खताबाबत चर्चा झाल्यावर आता अनेक शेतकरी असे खत खरेदी केल्याबाबत पुढे आले आहेत. 

कंपनीचे अधिकारी चक्रावले- पोटॅश खतावर सरकार अनुदान देते. करमाळा भागात विक्री झालेल्या या खताला पावत्या दिल्या गेल्या नव्हत्या. दुकानदारांनीही असे खत घेता येत नाही. त्यांना झुआरीचे खत बंद आहे हे माहीत असतानाही जादा कमिशन मिळण्याच्या आशेपोटी ही खरेदी झाली. झुआरी कंपनीच्या अधिकाºयांना पिशवीची खातरजमा करण्यासाठी बोलाविल्यावर छपाई पाहून तेही चक्रावले. अखेर आॅनलाईनवर ओरिजनल कंपनीच्या पिशवीचे डिझाईन तपासल्यावर बनाव उघड झाला.

अहवाल आल्यावर फुटणार बिंग- पिशवीतील खताचे नमुने घेऊन प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले आहेत अशी माहिती गुण नियंत्रण माहिती सागर बारवकर यांनी दिली. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यावर या टोळीने खत तयार करण्यासाठी काय काय वापरले हे स्पष्ट होणार आहे. पण सकृतदर्शनी ४० टक्के मीठ असल्याचे दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील दुकानात आढळलेले खत बोगस असल्याचे दिसून आले आहे.

शेतीचे होणार वाटोळे- करमाळा, माढा परिसरात बागायती शेतकरी उत्पादन वाढविण्यासाठी रासायनिक खत वापरावर भर देतात. रासायनिक खताच्या अतिवापराने शेतजमिनी क्षारपड होण्याचा धोका असल्याचे सांगितले जात असताना या टोळीने चक्क मीठापासून बनविलेले खत पुरवून शेतकºयांना संकटात टाकले आहे. या खताने पिकाचे तर वाटोळे झालेच याशिवाय सुपीक जमिनीला धोका निर्माण झाल्याची भीती अर्जुन गावडे या शेतकºयाने व्यक्त केली. 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीfraudधोकेबाजी