शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ग्रेट सॅल्युट; गर्भवती महिलेसाठी सुपरफास्ट एक्स्प्रेस २० मिनिटे थांबली

By appasaheb.patil | Updated: October 13, 2020 12:31 IST

आरपीएफ पोलिसांचे प्रसंगावधान; मुंबईच्या महिलेने सोलापुरात दिला मुलाला जन्म

ठळक मुद्देगर्भवती महिलेच्या मदतीसाठी २० मिनिटे टिकेकरवाडी स्टेशनवर थांबलीगर्भवती महिलेच्या मदतीसाठी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचाºयांनीही मोठी मदत केलीया महिलेस रुग्णवाहिकेतून सोलापूरकडे पाचारण केल्यावरच रेल्वेने टिकेकरवाडी स्टेशन सोडले

सुजल पाटील

सोलापूर : सोलापूर स्थानकावरून रेल्वेने प्रस्थान ठेवले...वाºयाच्या गतीने धावणाºया एक्स्प्रेसमधून मदत करा.. मदत करा.. असा आवाज येऊ लागला...हा आवाज ऐकून आरपीएफ पोलिसांनी प्रसंगावधान राखत काय झाले हे पाहण्यासाठी बोगीत घुसले. याचवेळी गर्भवती महिलेच्या वेदना पाहून पोलिसांनी क्षणाचाही विचार न करता एक्स्प्रेस रेल्वे जागेवर थांबविली़ शासकीय रुग्णवाहिका न आल्याने खासगी रुग्णवाहिकेचा आधार घेत वेळेवर त्या महिलेस रुग्णालयात पोहोचविले अन् त्या महिलेने गोंडस मुलाला जन्म दिला.

दरम्यान, मुुंबईहून बंगळुरुकडे निघालेल्या विशेष एक्स्प्रेसने सोलापूर सोडले़ सोलापूर रेल्वे स्थानकापासून थोड्या अंतरावर गाडी पोहोचली असता रेल्वेने प्रवास करणाºया मीनाक्षी मनोज राठोड (वय २०, रा़ मुंबई पाडा, भिवंडी, ठाणे) या गर्भवती महिलेस त्रास होऊ लागला़ सोबतच असलेल्या भावाने मदतीसाठी आरडाओरडा करायला सुरुवात केली़ दरम्यान, ड्युटीवर असलेले सुरक्षा बलाचे जवान (आरपीएफ पोलीस) शफिक शेख यांना महिलेस त्रास होत असल्याचे कळताच तत्काळ नियंत्रण कक्षाला फोन करून गाडी थांबविण्याची विनंती केली, विनंती करताना रेल्वेच्या चालकाने प्रसंगावधान राखत टिकेकरवाडी स्टेशनवर गाडी थांबविली़ तत्काळ गाडीतून खासगी वाहनाने सोलापूर गाठले़ आसरा चौकातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता काही वेळातच त्या महिलेने मुलाला जन्म दिला़ वेळेवर दाखल केल्यामुळे आता मुलगा व आई दोघेही चांगले असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाने कळविले. २० मिनिटे थांबली एक्स्प्रेस...मुंबईहून बंगळुरुकडे निघालेली सुपरफास्ट उद्यान एक्स्प्रेस त्या गर्भवती महिलेच्या मदतीसाठी २० मिनिटे टिकेकरवाडी स्टेशनवर थांबली होती, याचवेळी त्या गर्भवती महिलेच्या मदतीसाठी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचाºयांनीही मोठी मदत केली. या महिलेस रुग्णवाहिकेतून सोलापूरकडे पाचारण केल्यावरच रेल्वेने टिकेकरवाडी स्टेशन सोडले़ आरपीएफ जवानांचे सोशल मीडियावर कौतुकप्रसंगावधान राखत गर्भवती महिलेस मदत मिळवून देणाºया आरपीएफ पोलिसांच्या कामगिरीची वार्ता सोशल मीडियावर पसरली़ काही तासातच ही वार्ता वाºयासारखी सोशल मीडियावर व्हायरल झाली़ त्यानंतर मदतीसाठी धावून येणारे आरपीएफ जवान शफिक शेख, कॉन्स्टेबल चरणसिंग, कॉ़ संजय प्रसाद, रामचंद्र यांच्यासह रेल्वे प्रशासनाचे नेटिझन्ससह त्या गर्भवती महिलेच्या कुटुंबीयांनी कौतुक केले़  

टॅग्स :Solapurसोलापूरcentral railwayमध्य रेल्वेrailwayरेल्वेhospitalहॉस्पिटल