शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

रविवारपासून सोलापूर शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा, उजनीतून पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 12:14 IST

टाकळी इंटेकजवळील पाणीसाठा संपत आल्याने अखेर रविवारपासून शहर व हद्दवाढ भागाला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान उजनीतून भीमेत पाणी सोडण्यात आले असून, औज बंधारा भरेपर्यंत हा बदल लागू राहील, असे मनपा पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे. 

ठळक मुद्देशहराला टाकळी योजनेतून पाणी पुरवठा करणाºया औज व चिंचपूर बंधाºयातील पाणीपुरवठा संपुष्टात टाकळी पंपगृहासाठी भीमेच्या पात्रातून जॅकवेलमध्ये येणारे पाणी कमी झालेउजनीतून सोडलेले पाणी १६ बंधारे पार करून औजला पोहोचण्यासाठी सहा ते सात दिवसांचा कालावधी लागणार

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २० : टाकळी इंटेकजवळील पाणीसाठा संपत आल्याने अखेर रविवारपासून शहर व हद्दवाढ भागाला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान उजनीतून भीमेत पाणी सोडण्यात आले असून, औज बंधारा भरेपर्यंत हा बदल लागू राहील, असे मनपा पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे. शहराला टाकळी योजनेतून पाणी पुरवठा करणाºया औज व चिंचपूर बंधाºयातील पाणीपुरवठा संपुष्टात आला आहे. टाकळी पंपगृहासाठी भीमेच्या पात्रातून जॅकवेलमध्ये येणारे पाणी कमी झाले आहे. यातून शनिवारी एक दिवसाचा पाणीपुरवठा होऊ शकणार आहे. त्यानंतर उजनीतून सोडलेले पाणी औज व तेथून चिंचपूर बंधाºयात येईपर्यंत हा बदल लागू करण्यात आला आहे. उजनीतून सोडलेले पाणी १६ बंधारे पार करून औजला पोहोचण्यासाठी सहा ते सात दिवसांचा कालावधी लागणार आहे. यातून औज व चिंचपूर बंधाºयात पुरेसा साठा होईपर्यंत टाकळीचे काही पंप बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पुरेसा पाणी उपसा होणार नसल्याने शहराला तीन ऐवजी चार दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे यांनी केले आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका