शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाचा कडाका; सभांना गर्दी जमविण्याचे सर्वच पक्षांना टेन्शन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 14:25 IST

सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत एप्रिलच्या उन्हाचा कडाका उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरला आहे. दुपारच्या सभा व बैठकांना नागरिक येण्यास तयार नसल्याने उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींचे टेन्शन वाढले आहे. 

ठळक मुद्देसोलापुरात पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने पाणीटंचाई लोकसभा निवडणुकीत देशभरात उमेदवारांची पळवापळवी झाल्याच्या अनेक घटना पाहावयास मिळाल्या.सभा व बैठकांच्या रिकाम्या खुर्च्यांचे विरोधक भांडवल करतील या भीतीने दुपारची वेळ टाळा असे सांगितले जात आहे.

सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत एप्रिलच्या उन्हाचा कडाका उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरला आहे. दुपारच्या सभा व बैठकांना नागरिक येण्यास तयार नसल्याने उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींचे टेन्शन वाढले आहे. 

सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात आता चांगलाच रंग भरू लागला आहे. भाजप युती, काँग्रेस आघाडी व बहुजन वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांचा प्रचार जोमाने सुरू झाला आहे; मात्र प्रचाराला येण्यासाठी कार्यकर्ते कमी पडू लागले आहेत. त्याचे कारण उन्हाचा कडाका हा आहे. घरोघरी जाऊन प्रचार करण्यासाठी नेमलेले कार्यकर्ते सकाळी अकरा वाजेपर्यंत सक्रिय असतात. त्यानंतर ते गडप होतात ते सायंकाळीच हजर होत आहेत. याबद्दल विचारणा केल्यावर दुपारच्यावेळी लोकही घर बंद करून बसत असल्याने भेटत नसल्याचे कारण सांगितले जात आहे. 

उन्हाच्या कडाक्याचा धसका उमेदवारांनी घेतला आहे. प्रचारासाठी स्टार प्रचारकांचा दौरा मागताना सकाळी किंवा सायंकाळची वेळ मागितली जात आहे. दुपारी उन्हामुळे लोक सभांना येत नसल्याचे सांगितले जात आहे. सभा व बैठकांच्या रिकाम्या खुर्च्यांचे विरोधक भांडवल करतील या भीतीने दुपारची वेळ टाळा असे सांगितले जात आहे. शहरात सभा व बैठकांना गर्दी आणण्याची जबाबदारी नगरसेवकांवर दिली जात आहे. याचबरोबरीने बुथ प्रतिनिधींची व्यवस्था लावण्यात कार्यकर्ते व्यस्त दिसत आहेत. 

बुथ प्रतिनिधींची पळवापळवी- लोकसभा निवडणुकीत देशभरात उमेदवारांची पळवापळवी झाल्याच्या अनेक घटना पाहावयास मिळाल्या. आता अशीच स्थिती मतदान केंद्रापर्यंत आल्याचे चित्र सोलापुरात दिसत आहे. चुरशीच्या लढतीत बुथ प्रतिनिधींची पळवापळवी होत आहे. त्यामुळे प्रत्येक केंद्रांवर सक्षम बुथ प्रतिनिधी देण्याची व्यवस्था करण्यात प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी गुंतल्याचे दिसून येत आहे. 

आधी पाण्याची व्यवस्था हवी- उन्हाच्या कडाक्याने अंगाची लाहीलाही होत आहे. अशात सोलापुरात पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने पाणीटंचाई जाणवत आहे. अकरानंतर घेण्यात येणाºया सभा व बैठकांच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी निवडणूक प्रचार प्रमुखांवर आली आहे. त्यामुळे थंड जारला मागणी वाढली आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरTemperatureतापमानLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूर