शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

दोन मुलांसह मातेची आत्महत्या ; सरवदे नगरात धक्कादायक प्रकार

By विलास जळकोटकर | Updated: March 3, 2024 20:02 IST

साडीच्या सहाय्यानं गळफास : कारण गुलदस्त्यात, पोलिसांचा शोध सुरु

सोलापूर: मुळेगाव रोड येथील सरवदे नगरामध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना रविवारी दुपारी १२ च्या सुमारास उघडकीस आली. या धक्कादायक घटनेत एका मातेनं आपल्या दोन लेकरांसह गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. नागिरकांनी एकच गर्दी केल्याचे दिसून आले. या घटनेबद्दल एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.

स्नेहा संतोष चिल्लाळ (वय- ३०), संध्या संतोष चिल्लाळ (वय- ११), मनोजकुमार संतोष चिल्लाळ (वय- ७, सर्व रा. प्लॉट नं. ५, सरवदे नगर, जुना विडी घरकूल, सोलापूर) अशी मयतांची नावे आहेत. शासकीय रुग्णालयात त्यांना दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करुन मयत घोषित केले. मात्र सदर महिलेने हे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबतचे गूढ अजूनही कायम आहे. हा प्रकार पाहिल्यानंतर सदर महिलेचे पती संतोष सरवदे यांनी टाहो फोडून आजूचाजूच्या लोकांना जमवले. त्यानंतर तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्याला या घटनेची खबर देण्यात आली.

पोलीस हवालदार एस. एन. गायकवाड घटनास्थळी पोहोचले. बेशुद्धावस्थेतील तिघांनाही लोकांच्या मदतीने खाली उतरवण्यात आले. रुग्णवाहिका मागवून दुपारी पावणेतीनच्या सुमारास शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांनी तपासणी करुन तिघांचाही उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. आधी लेकरांना नंतर स्वत: गळफासयातील महिला स्नेहा सरवदे यांनी एवढ्या टोकाचं पाऊल का उचललं याबद्दल परिसरात तर्कवितर्क लढवले जात आहेत. नेमके कारण मात्र गुलदस्त्यात आहे. यातील मयत स्नेहा यांनी अगोदर दोन मुलांना गळफास दिला असावा त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलीस सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर