लव्हे येथील ऊसतोड कामगार मुलांना कपडे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:22 AM2020-12-31T04:22:12+5:302020-12-31T04:22:12+5:30

कुर्डूवाडी : सावित्रीबाई फुले मागासवर्गीय महिला मंडळाच्या वतीने माढा तालुक्यात लव्हे येथे ऊसतोड कामगारांच्या ५० मुलांना नवीन कपडे व ...

Sugarcane workers in Love distributed clothes to the children | लव्हे येथील ऊसतोड कामगार मुलांना कपडे वाटप

लव्हे येथील ऊसतोड कामगार मुलांना कपडे वाटप

Next

कुर्डूवाडी : सावित्रीबाई फुले मागासवर्गीय महिला मंडळाच्या वतीने माढा तालुक्यात लव्हे येथे ऊसतोड कामगारांच्या ५० मुलांना नवीन कपडे व खाऊवाटप करण्यात आले. यावेळी संचालक अमोल परिहार, नम्रता ननवरे, श्रीमंत परिहार, वर्षा ननवरे आणि पदाधिकारी उपस्थित होते.

दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याची मागणी

लांबोटी : मोहोळ तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांची संख्या मोठी आहे. ग्रामीण रुग्णालयात प्रत्येक महिन्यातील एक दिवस ठरवून देऊन प्रमाणपत्र देण्याची मागणी दिनेश माने यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या प्रमाणपत्राअभावी या बांधवांना इतर योजनांचा लाभ घेण्यात अडचणी येत आहेत.

सावळेश्वर- अर्जुनसोंड रस्ता झाला खराब

लांबोटी : मोहोळ तालुक्यात सावळेश्वर - अर्जुनसोंड रस्ता खराब झाला आहे. या मार्गावरून दररोज उसाची आणि दुधाची वाहतूक होते. जड वाहतुकीला अनेक अडथळे उद्भवत आहेत. अनेक वर्षांपासून हा रस्ता दुुरुस्तीच्या प्रतीक्षेत असून दोन्ही गावातील लोक त्रस्त आहेत. रस्ता दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.

बाळे - कारंबा मार्गावरील खड्डे बुजवा

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील महत्त्वाचा बार्शी मार्ग म्हणून हा रस्ता ओळखला जाताे. त्याचे चौपदरीकरण होणार असल्याचे सांगितले जाते. मात्र या कामाला आणखी कालावधी लागत असून सध्या हा रस्ता रहदारीबाबत धोकादायक मानला जात आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे असून ते बुजविण्याची मागणी होत आहे.

पोफळी-अर्जुनसोंड रस्ता नव्याने करण्याची मागणी

लांबोटी : पोफळी-अर्जुनसोंड रस्ता खराब झाला आहे. हा रस्ता कॅनॉल साईडपट्टीवरून गेलेला आहे. या भागातून या रस्त्यावरून उसाची आणि फळपिकांची वाहतूक होते. या रस्त्यावर खड्ड्यांची संख्या मोठी आहे. त्याची डागडुजी करून फारसा उपयोग होणार नसून तो तत्काळ नव्याने करण्याची मागणी होत आहे.

धूळ न हटवताच बासलेगाव - उडगी रस्त्यावर खड्डे बुजवणूक

उडगी : अक्कलकोट तालुक्यातील बासलेगाव - उडगी पाच किलोमीटरच्या रस्तेदुरुस्तीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार काही ग्रामस्थांनी केली आहे. या पूर्वी गावकऱ्यांनी ही तीने काम थांबवली होती. डांबरीकरणानंतर खड्डे बुजविताना एअर कॉम्प्रेसर न वापरता, संबंधित खड्ड्यातील धूळ न हटविता सरळ खडीकरण केले जात आहे. याबाबत उडगी येथील राजू पाटोळे, धोंडूराज बनसोडे, सिद्रय्या सोड्डे यांनी हे काम व्यवस्थित करण्याची मागणी केली आहे.

बोरोटी - दुधणी रस्ता झाला खराब

उडगी : अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी-दुधणी १० किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाकडे पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नाही. रस्त्यावर मोठे खड्डे आहेत. झाडेझुडपे वाढलेली आहेत. समोरचा रस्ता दिसत नसल्याने अपघात होत आहेत. त्यामुळे नवीन रस्ता करावा अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.

अक्कलकोट तालुक्यात ऊसतोडीला मजूर मिळेना

चपळगाव : अक्कलकोट तालुक्याच्या उत्तर भागात उसाचे क्षेत्र मोठे आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे पाणी मुबलक उपलब्ध आहे. ऊसक्षेत्रात भर पडली आहे. सगळीकडेच कारखाने सुरू असले तरी ऊसतोड कामगारांच्या कमतरतेमुळे ऊसतोडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कारंबा-बाणेगाव मार्गावर पथदिवे बसवा

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यात कारंबा-बाणेगाव मार्गावर पथदिवे नसल्याने रात्री अंधारात शेतीमालाची वाहतूक करावी लागते. कारंबा-बाणेगाव या मार्गावरील रस्ता चांगला असल्याने मार्डी आणि भोगावसह अनेक गावांतील वाहतूक या मार्गावरून होते. पथदिवे नसल्याने काहींना अपघाताला सामोरे जावे लागले आहे.

हिंगणी-शिरापूर रस्ता नव्याने करा

लांबाेटी : मोहोळ तालुक्यात शिरापूर-हिंगणी हा मार्ग लांबोटी येथून गेला असून या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. हा रस्ता रहदारीसाठी अत्यंत खराब झाला आहे. या मार्गावरून काही दिवसांत वाळूसह अन्य प्रकारची जड वाहतूक झाली आहे. तो दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Sugarcane workers in Love distributed clothes to the children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.