शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

ऊस गाळपात सोलापूर राज्यात प्रथम, ६४ कारखान्यांचे ४१ लाख मेट्रिक टन गाळप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 10:58 IST

राज्यात आता ऊस गाळपाने चांगलाच वेग घेतला असून, १६० साखर कारखान्यांचे एक कोटी ९ लाख ६७ हजार इतके गाळप झाले आहे. अहमदनगर, औरंगाबाद व नांदेड विभागातील ६४ कारखान्यांचे ४१ लाख  मेट्रिक टन इतके गाळप झाले आहे. राज्यात सोलापूरचे सर्वाधिक गाळप  झाले आहे.

ठळक मुद्देराज्यात सोलापूरचे सर्वाधिक गाळप  राज्यातील १९३ साखर कारखान्यांनी यावर्षी आॅनलाईन गाळप परवाने मागितले होते सोलापूर जिल्ह्याचे २२ लाख १८ हजार ३८९ मे.टन. गाळपकोल्हापूरचे २१ तर अहमदनगरचे १९ कारखाने सुरू

अरुण बारसकर सोलापूर दि २५ : राज्यात आता ऊस गाळपाने चांगलाच वेग घेतला असून, १६० साखर कारखान्यांचे एक कोटी ९ लाख ६७ हजार इतके गाळप झाले आहे. अहमदनगर, औरंगाबाद व नांदेड विभागातील ६४ कारखान्यांचे ४१ लाख  मेट्रिक टन इतके गाळप झाले आहे. राज्यात सोलापूरचे सर्वाधिक गाळप  झाले आहे.राज्यातील १९३ साखर कारखान्यांनी यावर्षी आॅनलाईन गाळप परवाने मागितले होते. त्रुटी पूर्ण करणाºया सर्वच कारखान्यांना साखर आयुक्त कार्यालयाने परवाने दिले असून, गाळपही सुरू केले आहे. यावर्षी उसाचे क्षेत्र बºयापैकी असल्याने राज्यभरातील सर्वच सातही विभागातील साखर कारखाने सुरू झाले आहेत. पश्चिम महाराष्टÑातील कोल्हापूर व पुणे विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे व सोलापूर जिल्ह्यात ऊस पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. आता अहमदनगर, औरंगाबाद व नांदेड विभागातही उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. मागील दोन वर्षे दुष्काळ असल्याने राज्यभरातच उसाचे क्षेत्र घटले होते; मात्र यवर्षी ऊस क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. कोल्हापूर विभागातील ३५ साखर कारखान्यांनी तर पुणे विभागातील ५७ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. सोलापूर जिल्ह्याचे २२ लाख १८ हजार ३८९ मे.टन. गाळप झाले असून राज्यातील अन्य जिल्ह्याच्या तुलनेत हे सर्वाधिक गाळप आहे. अहमदनगर विभागातील अहमदनगरच्या १९ व नाशिकच्या दोन अशा २१ साखर कारखान्यांनी १७ लाख १० हजार १६५ मे.टन गाळप केले आहे.  औरंगाबाद विभागातील  नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना व बीड या जिल्ह्यातील  १८ साखर कारखान्यांनी ९ लाख ७७ हजार २४० मे.टन गाळप केले आहे. नंदूरबारचे तीन, जळगावचे दोन, औरंगाबादचे तीन, जालन्याचे पाच तर बीडचे पाच कारखाने सुरू झाले आहेत.  नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील २५ साखर कारखान्यांनी १४ लाख १३ हजार १७७  मे.टन ऊस गाळप केले आहे. अमरावती विभागातील यवतमाळच्या दोन कारखान्यांनी एक लाख तर नागपूरचा एक साखर कारखाना सुरू झाला आहे. ----------------------------अहमदनगरचे १९ कारखाने सुरूच्मागील वर्षी संपूर्ण राज्यातच उसाचे क्षेत्र कमी होते. यावर्षी ऊस क्षेत्र वाढल्याने गाळप घेणाºया कारखान्यांची संख्याही वाढली आहे. सोलापूरचे ३० कारखाने गाळप घेत आहेत, कोल्हापूरचे २१ तर अहमदनगरचे १९ कारखाने सुरू झाले आहेत. अहमदनगरचे साखर कारखाने सोलापूरपेक्षा अगोदर सुरू झाले आहेत. जिल्ह्यात २८ कारखाने सुरूच्कोल्हापूर विभागातील कोल्हापूरचे २१ व सांगलीच्या १३ कारखान्यांचे २४ लाख ९५ हजार ७७१  मे.टन गाळप झाले आहे. पुणे विभागातील पुणे जिल्ह्यातील १५, सातारा जिल्ह्यातील १३ व सोलापूर जिल्ह्यातील २८ साखर कारखान्यांचे ४२ लाख ५९ हजार ९१५ मे.टन गाळप झाले आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखाने