शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील साखर हंगामाची ‘डेडलाईन’ पुढे जाणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 10:48 IST

पक्षपंधरवड्याचीही अडचण : ऊसतोडणी मजुरांच्या संपाचे कारण

ठळक मुद्देराज्यात मागील वर्षीपेक्षा यावर्षी उसाचे क्षेत्र अधिक एक आॅक्टोबरपासून साखर हंगाम सुरू होण्याची शक्यता कमीच२४ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबर  हा पक्ष पंधरवडा कालावधी

अरुण बारसकर सोलापूर: ऊस तोडणी मजुरांचा संप त्यातच पक्ष पंधरवड्याच्या अडथळ्यामुळे एक आॅक्टोबरपासून साखर हंगाम सुरू होण्याची शक्यता कमीच आहे. याशिवाय हंगाम सुरू करण्याची मुख्यमंत्र्यांच्या  अध्यक्षतेखालील मंत्री समितीची तारीखही निश्चित केलेली नाही.

राज्यात मागील वर्षीपेक्षा यावर्षी उसाचे क्षेत्र अधिक आहे. ऊस गाळप हंगामाचे नियोजन करण्यासाठी मागील महिन्यात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी साखर संकुलात एक बैठक घेतली होती. या बैठकीनंतर सहकारमंत्र्यांनी एक आॅक्टोबरला हंगाम सुरू करण्याबाबत सांगितले होते. ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणात असले तरी ऊस तोडणी मजूर संघटनेने तोडणी-वाहतूक दर वाढविण्याच्या मागणीसाठी संप पुकारला आहे.

सध्याच्या दराच्या कराराची मुदत पुढीलवर्षी संपणार असली तरी पुढील वर्षी निवडणुकीचा बिगुल वाजणार असल्याने ऊस तोडणी मजूर संघटनेच्या नेत्यांनी संप जाहीर केला आहे. त्यातच २४ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबर  हा पक्ष पंधरवडा कालावधी आहे. पक्ष पंधरवडा हा कालावधी अशुभ समजला जात असल्याने अनेक कारखानदार केवळ मोळी टाकून ठेवण्याची शक्यता आहे. १८ आॅक्टोबर रोजी विजयादशमीचा सण असून या दिवशी भगवान गडावर होणाºया मेळाव्याला बराचसा मजूरवर्ग उपस्थित असतो. 

मंत्री समितीची बैठक महत्त्वाचीच्राज्यातील मागील साखर हंगामातील शेतकºयांचे एफआरपीनुसार देणे,ऊस तोडणी मजुरांचे देणेबाकी तसेच पुढील हंगामात येणाºया अडचणींवर मंत्री समिती बैठकीत चर्चा होऊन मुख्यमंत्री निर्णय घेतात. मागील वर्षीच्या व अगोदरच्या हंगामाची एफआरपी आजही अनेक कारखाने देत नाहीत. त्यामुळे मंत्री समितीची बैठक तितकीच महत्त्वाची आहे.

साखर कारखान्याकडून १ आॅक्टोबरपासून कारखाने सुरू करण्याची मागणी आहे. त्यानुसार चर्चा करण्यात आली होती; मात्र अद्याप मंत्री समितीची बैठक झाली नाही. आॅक्टोबरमध्ये कारखाने सुरू होतील.- सुभाष देशमुख, सहकार व पणनमंत्री

जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्याने ऊस वेळेवर तोडला नाही तर शेतकºयांचे नुकसान होणार आहे. आम्ही ३० तारखेला मोळी टाकून ठेवणार आहोत.राजन पाटील,  लोकनेते शुगर, अनगर

तोडणी-वाहतूक मजुरीत वाढ करण्याची आमची मागणी आहे. पंकजाताई मुंडे यांच्याशी चर्चा झाली असून दसºयाला निर्णय होण्याची शक्यता आहे.-काशिनाथ दराडे  ऊस तोडणी मुकादम, बीड

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेSubhash Deshmukhसुभाष देशमुखDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस