शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

शाळेची पायरीही न चढलेले वडील लेकीसाठी झटले; 'न्यायाधीश' होऊन मुलीनं पांग फेडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 11:01 IST

उपळाई खुर्दची अनिता हवालदार हिचे न्यायाधीश परीक्षेत यश

ठळक मुद्देमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने दिवाणी न्यायाधीश क स्तर व न्यायदंडाधिकारी प्रवर्ग मुख्य परीक्षा-२०१९ माढा तालुक्यातील उपळाई खुर्द येथील अनिता दादा हवालदार यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवलाया परीक्षेचा निकाल २१ रोजी जाहीर झाला़ त्यानंतर त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला

माढा : घरची परिस्थिती हलाखीची, त्यात आई-वडिलांनाही अक्षर ओळख नव्हती़ मात्र त्यांच्या कष्टाच्या प्रेरणेमुळे हे यश मिळाल्याची भावना न्यायाधीशाच्या परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम आलेल्या अनिता हवालदार यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने दिवाणी न्यायाधीश क स्तर व न्यायदंडाधिकारी प्रवर्ग मुख्य परीक्षा-२०१९ या परीक्षेत माढा तालुक्यातील उपळाई खुर्द येथील अनिता दादा हवालदार यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या परीक्षेचा निकाल २१ रोजी जाहीर झाला़ त्यानंतर त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.

घरची परिस्थिती हलाखीची आहे. शिवाय शाळेचा उंबरठादेखील माहीत नसलेले वडील दादा हवालदार यांनी आपल्या मुलीला कोणत्याही परिस्थितीत शिक्षण द्यायचे, असा चंग बांधला होता़ माझ्यासाठी त्यांनी अहोरात्र अपार कष्ट केले. त्यांच्या प्रेरणेनेच मला यश मिळवून दिल्याचे अनिता हवालदार यांनी सांगितले.

अ‍ॅड. अनिता यांचे प्राथमिक शिक्षण चिखर्डे (ता़ करमाळा) येथे झाले. माध्यमिक शिक्षण उपळाई खुर्द (ता़ माढा) येथील शाळेत तर पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात पुढील शिक्षण घेतले. त्यानंतर सोलापूर येथील दयानंद महाविद्यालयात लॉ पदवी मिळविली आहे. त्यांच्या या यशाबद्दल उपळाई पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.

आई-वडिलांची प्रेरणा तर होतीच शिवाय मामा-मामी यांची शिक्षणासाठी मदत झाली. हे यश माझ्या जीवनातील सर्वात आनंद देणारा आहे़- अनिता हवालदार

परिस्थिती गरिबीची असली तरी मुलांनी शिकून मोठं व्हावं़ आपल्या कर्तृत्वाने नावलौकिक करावा़ यासाठी प्रेरणा दिली़ पाठबळ दिले. आपणास शाळेत शिकता आले नाही याची खंत न ठेवता ती उणीव मुलीने भरून काढली़- दादा हवालदार, वडील

टॅग्स :SolapurसोलापूरCourtन्यायालयadvocateवकिलexamपरीक्षाMPSC examएमपीएससी परीक्षा