शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कायद्याच्या अधीन राहून सोलापूर जिल्ह्यात पुन्हा पाण्याच्या पिशव्यांची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 15:18 IST

औरंगाबाद खंडपीठाचा दिलासा: महाराष्ट्र पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर असोसिएशनची भूमिका

ठळक मुद्देराज्य शासनाकडून २३ मार्च २०१८ रोजी राज्यात कमी घनतेच्या प्लास्टिकवर बंदी घालण्याची अधिसूचना प्रसिद्ध केली होतीपाऊच उत्पादक महाराष्ट्र पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनतर्फे सचिव जावेद अख्तर सय्यद यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली

सोलापूर: पिण्याच्या पाण्याच्या पिशव्यांची जाडी, पुनर्वापराची क्षमता आणि विस्तारित उत्पादनाची जबाबदारी याविषयीची अधिसूचना ३० जून २०१८ च्या खंड ४ प्रमाणे सेल तर उत्पादक व्यवसाय करू शकतात. कायदेशीर बाबींचे पालन करत पिशव्यांना परवानगी असेल, असा निर्वाळा औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. या आधारे सोलापूर जिल्ह्यात पाणी पिशव्यांची सोय पुन्हा करण्याची भूमिका महाराष्ट्र पॅकेज्ड ड्रिंकिंग मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनने घेतली आहे. 

राज्य शासनाकडून २३ मार्च २०१८ रोजी राज्यात कमी घनतेच्या प्लास्टिकवर बंदी घालण्याची अधिसूचना प्रसिद्ध केली होती. त्यामुळे ५० मायक्रोपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली. याविरुद्ध पाऊच उत्पादक महाराष्ट्र पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनतर्फे सचिव जावेद अख्तर सय्यद यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. शासनाने पाण्याच्या प्लास्टिक पिशव्यांवर अचानक बंदी घातली. बंदी घालताना राज्यात किती उत्पादक आहेत. यावर उपजीविका करणारा वर्ग किती आहे, याचा विचार केला नाही. याउलट बिस्किटे व अन्य खाद्यपदार्थांच्या प्लास्टिक पाऊचवर बंदी घातली नाही, याबद्दल स्पष्टीकरण दिलेले नाही, अशी भूमिका असोसिएशनच्या वतीने खंडपीठापुढे घेण्यात आल्याचे म्हटले आहे.

ग्रामीण भागात पाऊचमध्ये सहजपणे पाणी उपलब्ध होते. बाटलीबंद पाण्यापेक्षा ते स्वस्त असल्याने ग्राहकांना ते परवडते. त्यामुळे ही बंदी हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. यावर औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती ए. एम. ढवळे आणि न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला यांनी वरीलप्रमाणे स्पष्ट केले आहे. या याचिकेवर ६ जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे. यामध्ये याचिकाकर्त्यांकडून अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर आणि अ‍ॅड. आवटे काम पाहत आहेत.

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील पाच हजार कामगारांना यामुळे रोजगार मिळणार आहे. नव्याने जे पाण्याचे पाऊच तयार होतील, त्याचे रिसायकलिंग करण्यात येणार आहे. यासाठी असोसिएशनच्या वतीने यासंबंधी मार्गदर्शनासाठी गो-ग्रीन कंपनीशी सामंजस्य करार केला आहे.- विनायक महिंद्रकरजिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर मॅन्युफॅक्चरिंग असो., सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणीwater transportजलवाहतूकCourtन्यायालय