शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
2
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
3
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
5
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
6
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
7
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
8
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
9
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
10
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
11
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
12
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?
13
एकावर एक बोनस शेअर देणार 'ही' कंपनी; सोबत डिविडंडही मिळणार; गुंतवणुकदारांना दुप्पट फायदा
14
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
15
८८२ कोटींचा खर्च, २०२८ मध्ये होणार पूर्ण; ८ ऑगस्टला सीतामातेच्या जानकी मंदिराचे भूमिपूजन
16
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
17
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
18
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
19
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
20
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट

ऊस दराबाबतीत एकतर्फी निर्णय घेणार नाही, सुभाष देशमुख यांचे आश्वासन, कारखानदारांची दोन दिवसांत बैठक घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 11:51 IST

जिल्ह्यातील ऊसदरासंदर्भात मी एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही़ निर्णय घेण्यासाठी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कारखानदारांना विश्वासात घेऊनच, योग्य तो तोडगा काढू, असे आश्वासन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले़

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या सूचनेने सहकारमंत्री पंढरीतवजन काट्यामध्ये शेतकºयांची फसवणूक होऊ नयेजिल्हाधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक

आॅनलाइन लोकमत सोलापूरपंढरपूर दि २०  : जिल्ह्यातील ऊसदरासंदर्भात मी एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही़ निर्णय घेण्यासाठी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कारखानदारांना विश्वासात घेऊनच, योग्य तो तोडगा काढू, असे आश्वासन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले़तालुक्यातील भंडीशेगाव येथील बाजीराव विहिरीजवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष समाधान फाटे, तालुकाध्यक्ष नवनाथ माने, चंद्रकांत बागल हे गेल्या ९ दिवसांपासून उपोषण करीत आहेत़ त्यामुळे त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांची भेट घेण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख आले होते़ त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांना हे आश्वासन सहकारमंत्र्यांनी दिले़ यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ जगदाळे उपस्थित होते.देशमुख म्हणाले, मी शेतकरी संघटनेच्या सूचनेनुसार वजन काट्यामध्ये शेतकºयांची फसवणूक होऊ नये, यासाठी जिल्हाधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक नेमले आहे़ मी कारखानदारांना एफआरपीनुसार दर द्यावा यासाठी सूचना करु शकतो; मात्र त्यांना जादा दर द्या, म्हणून दबाव टाकू शकत नाही. त्यामुळे  मधला मार्ग काढण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कारखानदारांची दोन दिवसात बैठक लावून योग्य तो निर्णय जाहीर करु, असे आश्वासन सुभाष देशमुख यांनी दिले. -----------------मुख्यमंत्र्यांच्या सूचनेने सहकारमंत्री पंढरीतउसाला पहिली उचल २७०० रुपये मिळावी, यासाठी बाजीराव विहीर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तीन कार्यकर्ते उपोषण करत आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याची माहिती कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली होती़ यामुळे मुख्यमंत्र्यांनी मला उपोषणकर्त्यांची भेट घेण्यास सांगितले़ त्यांच्या सूचनेनुसार मी आज आपली भेट घेतल्याचे सुभाष देशमुख यांनी दिली.--------------उपचार घेण्यास तयारदोन दिवसात कारखानदार, शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी यांची बैठक घेऊन ऊसदराविषयी योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी केवळ उपचार घेण्यास सहमती दर्शविली आहे; मात्र ऊसदराचा तोडगा निघेपर्यंत उपोषण सुरूच राहील, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले़ ----------------राज्य व जिल्हा पातळीवर बैठक झाली आहे. त्यामध्ये अनेक जिल्ह्यातील उसाच्या दराचा प्रश्न मार्गी लागला आहे, परंतु सोलापूर जिल्ह्याचा प्रश्न सुटला नाही. मी जिल्ह्यातील सर्व शेतकºयांना चांगला दर मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे.- सुभाष देशमुखसहकारमंत्री

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेSubhash Deshmukhसुभाष देशमुख