शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

सुभाष देशमुख, राजेंद्र राऊत, दीपक साळुंखे, समाधान आवताडेंसह १९४ जणांनी नेले २७७ उमेदवारी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 17:37 IST

विधानसभा निवडणुक; पहिल्यादिवशी तीन उमेदवारी अर्ज दाखल

ठळक मुद्देविधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज वाटप व स्वीकृतीचे काम सुरूसर्व तहसील कार्यालयात अर्ज देणे व घेण्याची सोय करण्यात आली आहेअक्कलकोट विधानसभेसाठी  गंगाराम कटकधोंड उर्फ व्यंकटेश स्वामी यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले

सोलापूर : जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात पहिल्याच दिवशी १९४ जणांनी २७७ उमेदवारी अर्ज नेले आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेंद्र   भोसले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.  सोलापूर दक्षिणसाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख, बार्शीत राजेंद्र राऊत, सांगोल्यात दीपक साळुंखे पाटील आणि पंढरपुरात समाधान आवताडे, शैला गोडसे यांनी उमेदवारी अर्ज नेले.

विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज वाटप व स्वीकृतीचे काम सुरू करण्यात आले आहे. सर्व तहसील कार्यालयात अर्ज देणे व घेण्याची सोय करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी १९४ जणांनी अर्ज नेले आहेत. अक्कलकोट विधानसभेसाठी  गंगाराम कटकधोंड उर्फ व्यंकटेश स्वामी यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर पंढरपूर येथे सुदर्शन खंदारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

विधानसभानिहाय नेण्यात आलेले अर्ज पुढीलप्रमाणे आहेत. कंसात अर्ज नेणाºया व्यक्तींची संख्या आहे. करमाळा: १६ (१३), माढा: ९ (७), बार्शी: ३0 (३0), मोहोळ: १४, सोलापूर शहर उत्तर: १९ (१७), सोलापूर शहर मध्य: ३५ (२७), अक्कलकोट: २२ (१५), दक्षिण सोलापूर : ३७ ,(३७), पंढरपूर: ३६ (२0), सांगोला: ४0 (१९), माळशिरस: १९ (९).शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर सपाटे, महेश निकंबे, वंचित बहुजन आघाडीचे आनंद चंदनशिवे यांनी अर्ज नेले आहेत. दक्षिण सोलापूरमध्ये सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी प्रतिनिधीमार्फत अर्ज नेला आहे. शहर मध्यमध्ये माजी आमदार आडम मास्तर, स्वाभिमानी रिपाइंचे दीपक गवळी, हिंदुस्तान जनता पार्टीचे गौस कुरेशी, भाजपचे नगरसेवक  नागेश वल्याळ, एमआयएमचे इरफान शेख, बसपाचे राहुल सर्वगोड, शिवसंग्रामचे मनीष गायकवाड व पीपीआयचे आनंद जगदने यांनी अर्ज नेले आहेत. 

चोख पोलीस बंदोबस्त- विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज देण्या-घेण्याची प्रक्रिया आजपासून सुरू केल्याने सकाळी ११ ते दुपारी तीन या वेळात निवडणूक कार्यालयात गर्दी होऊ नये म्हणून शंभर मीटरच्या अंतरावर सर्व प्रकारची वाहने रोखून धरण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शहर उत्तर व दक्षिण सोलापूर अशी दोन निवडणूक कार्यालये असल्याने प्रवेशद्वारावरच वाहने अडविण्यात आली. यामुळे वाहतूक जामची समस्या निर्माण झाली. निवडणूक कार्यालयाबाहेर गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कार्यालयात अर्ज घेणे व देण्यासाठी आलेल्यांनाच प्रवेश दिला जात आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारणElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय