शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

सोलापुरातील विद्यार्थीही अडकला ‘ब्लू व्हेल’च्या जाळ्यात,पोलिसांची तत्परता: बसमधून मुलास ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 3:03 PM

सोलापूर दि १० : जगाला हादरवून सोडणाºया ‘ब्लू व्हेल’ गेमचा मुद्दा भारतातही चर्चेला आलेला असताना या गेमचे लोण आता सोलापुरातही पोहोचले आहे. सोलापुरातील एक अल्पवयीन मुलगा या गेमच्या आहारी जाऊन एकटाच पुण्याच्या दिशेने निघाला असताना पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षातून आलेल्या एका संदेशाद्वारे त्याला भिगवण पोलिसांनी ताब्यात घेतले. 

ठळक मुद्दे१४ वर्षांचा मुलगा ‘ब्लू व्हेल’च्या आहारी त्या मुलास ताब्यात घेता आल्याचे सपोनि राठोड यांनी सांगितले. 

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १० : जगाला हादरवून सोडणाºया ‘ब्लू व्हेल’ गेमचा मुद्दा भारतातही चर्चेला आलेला असताना या गेमचे लोण आता सोलापुरातही पोहोचले आहे. सोलापुरातील एक अल्पवयीन मुलगा या गेमच्या आहारी जाऊन एकटाच पुण्याच्या दिशेने निघाला असताना पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षातून आलेल्या एका संदेशाद्वारे त्याला भिगवण पोलिसांनी ताब्यात घेतले. सोलापुरातील जुळे सोलापूर परिसरात राहणाºया व्यावसायिकाचा १४ वर्षांचा मुलगा ‘ब्लू व्हेल’च्या आहारी गेल्याने या नादातच तो सोलापूरच्या बसस्थानकावरुन पुण्याच्या बसमध्ये बसून निघाला असल्याची माहिती पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षातून भिगवण पोलिसांना गेली. तेथील सहायक पोलीस निरीक्षक नीलकंठ राठोड यांनी सकाळी १० च्या सुमारास भिगवण बसस्थानक गाठले. नियंत्रण कक्षातून आलेल्या माहितीनुसार त्यांनी बसची तपासणी केली असता संबंधित वर्णनाचा मुलगा मिळाला. त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून वडिलाचा फोन क्रमांक घेऊन कळविले. दुपारी एकच्या सुमारास वडील, चुलते अन्य नातलगांकडे त्याला सुपूर्द करण्यात आले. सोलापूरहून फोन आल्यामुळेच त्या मुलास ताब्यात घेता आल्याचे सपोनि राठोड यांनी सांगितले. -----------------काय आहे ब्लू व्हेल गेमब्लू व्हेल या गेममध्ये मुला-मुलींना सोशल मीडियावरून संपर्क करण्यात येतो. यात दररोज एक याप्रमाणे ५० दिवस काही काम करण्यास सांगितले जाते. शेवटच्या दिवशी या गेममध्ये सहभागींना आत्महत्या करण्याचे आवाहन गेमद्वारे केले जाते. जगभरात अनेक मुलांनी आत्महत्या केल्या आहेत.