शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यात अडकून दुचाकीस्वार उसाच्या ट्राॅलीखाली चिरडला

By काशिनाथ वाघमारे | Updated: February 3, 2024 17:08 IST

मासे खरेदी भोवली : बार्शी-तुळजापूर रोडवरील अपघात.

काशिनाथ वाघमारे, सोलापूर: बार्शी बसस्थानकासमोर तुळजापूर रोडवर खड्ड्यात अडकून एक दुचाकीस्वार उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीखाली चिरडून ठार झाला.

प्रदीप उत्तरेश्वर चव्हाण (वय ३०, रा. यशवंतनगर, बार्शी) असे मरण पावलेल्या मोटारसायकलस्वाराचे नाव आहे. हा अपघात तुळजापूर रोडवर मारुती मंदिराजवळ २ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास झाला. मृत प्रदीपचा भाऊ शुभम चव्हाण याने बार्शी शहर पोलिसांत ३ फेब्रुवारी रोजी फिर्याद दिली.पोलिस सूत्राकडील माहितीनुसार, शुक्रवारी रात्री उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. एमएच १३ एजे ७८५८) ही तुळजापूर रोडवरून एका साखर कारखान्याकडे निघालेली होती. दरम्यान प्रदीप चव्हाण हा येथून मित्राच्या दुचाकीवरून (क्र. एमएच १३ सीएफ ०१८१) पोस्ट चौकात मासे खरेदीसाठी आला होता. तो परत याच रोडवरून घराकडे जात होता.

अपघातस्थळी रस्त्यावरील खड्ड्यात त्याची दुचाकी अडकली आणि तो येथून निघालेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीखाली सापडला आणि चिरडून जागीच मृत पावला. अपघाताची माहिती मिळताच बार्शी शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पुढील तपास पोलिस नाईक अडसूळ करत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात