शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचेे स्टिअरिंग लाॅक झाले अन् कारला फरफटत नेले, चालकासह दोघे जखमी

By काशिनाथ वाघमारे | Updated: May 21, 2023 20:18 IST

पंढरपूर- मल्हार पेठ रस्त्यावरील अपघात

सोलापूर : भरधाव एसटी बसचे स्टिअरिंग लॉक झाले आणि कारला फरफटत नेल्याची घटना पंढरपूर- मल्हारपेठ मार्गावर घडली. या अपघातात कारचालकासह दोघे जण जखमी झाले. कारचालकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले.हा अपघात रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास कटफळ (शेरेवाडी) स्टॉपजवळ घडला. कार चालक सोमनाथ गेनदेव शिंदे (३५) व केदारी भागवत पाटील, (वय ४५, दोघेही रा. निमगाव, ता. माढा), अशी जखमींची नावे आहेत.

पोलिस सूत्राकडील माहितीनुसार माढा तालुक्यात निमगाव येथील सोमनाथ गेनदेव शिंदे व त्यांचा मित्र केदारी भागवत पाटील हे दोघे जण मिळून रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास कार (एमएच ४५ एएल ८०२२)मधून सांगली जिल्ह्यात आटपाडी येथे विवाह सोहळ्यासाठी निघाले होते. राज्य परिवहन महामंडळ, पाटण आगाराची एसटी बस (एमएच १४ / बीटी ४१०५) कराडहून सोलापूरला निघाली होती. दोन्ही वाहनांची पंढरपूर- मल्हार पेठ महामार्गावर कटफळ शिवारात समोरासमोर धडक झाली. अपघातात चालक सोमनाथ शिंदे व केदारी पाटील हे दोघे जण जखमी झाले. अपघातानंतर एसटी बसचेेे स्टिअरिंग लाॅक झाले आणि एसटीने कार तशीच पुढे फरफटत नेल्याचे पोलिसांनी सांगितले. सुदैवाने एसटीमधील प्रवाशांना काहीही झाले नाही.

अपघाताची माहिती मिळताच पोलिस हेडकॉन्स्टेबल बापूसाहेब झोळ, पोलिस नाईक केदारनाथ भरमशेट्टी, पोलिस कॉन्स्टेबल लक्ष्मण वाघमोडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदत केली.

टॅग्स :AccidentअपघातSolapurसोलापूर