शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली
2
प्रियकराने सोनमला संपविले अन् अजगर असलेल्या विहिरीत फेकले; दोन वर्षांनी पोलिसांना...
3
RBI Policy पूर्वी शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला, फार्मा शेअर्समध्ये तेजी
4
६३ कोटींचा दसरा मेळावा, भाजपाचा गंभीर दावा; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, ९ आकड्याचं गणित सांगितलं
5
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
6
"असीम मुनीर म्हणाले, तुम्ही कोट्यवधी लोकांचे जीव वाचवले"; डोनाल्ड ट्रम्प आता काय बोलले?
7
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
8
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
9
"...तर तुमची चूक माफ करणार नाही"; प्रिया मराठेच्या निधनानंतर शंतनूची पहिली पोस्ट, वाचून डोळे पाणावतील
10
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
11
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
12
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
13
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
14
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
15
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
16
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
17
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
18
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
19
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
20
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!

कडक निर्बंध; राज्याच्या पाच तर सोलापूर जिल्ह्याच्या २३ ठिकाणी असणार नाकाबंदी

By appasaheb.patil | Updated: April 23, 2021 18:25 IST

सोलापूर जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या प्रवाशांवर पोलिसांचा असणार वॉच

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : राज्यातील वाढता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लागू केलेल्या संचारबंदीसह इतर निर्बंध आणखी कठोर केले आहेत. नव्या आदेशानुसार एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करणाऱ्या लोकांना विनापरवाना प्रवास करता येणार नाही. त्याच दृष्टीने सोलापूर ग्रामीण पोलिसांनी राज्याच्या ५, तर जिल्ह्याच्या २३ अशा एकूण २८ ठिकाणी नाकाबंदी केली आहे. शिवाय मोठ्या शहरातील प्रत्येक चौकावर पोलिसांचे विशेष लक्ष असणार असून नियम तोडणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

मागील काही दिवसांपासून राज्याबरोबरच सोलापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाय मृत्यू दरातही वाढ होत आहे. ही साखळी तोडण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. ‘ब्रेक द चैन’अंतर्गत विविध आदेश पारित करण्यात आले असून त्यानुसार संपूर्ण राज्यात कडक संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा देणारी वाहने व अन्य कर्मचाऱ्यांना राज्य किंवा जिल्हा प्रशासनाकडून पासेस दिले आहेत. पासेस असतील तरच त्यांना प्रवेश दिला जाईल. अन्यथा कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. शक्यतो नागरिकांनी प्रवास करू नये, नियमांचे पालन करावे अन्यथा संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक सातपुते यांनी दिला आहे.

-------------

याठिकाणी असेल कडक नाकाबंदी...

- आंतरराज्य नाकाबंदी

पोलीस ठाणे नाकाबंदी ठिकाण

  • अक्कलकोट उत्तर - वागदरी (कर्नाटक राज्य)
  • अक्कलकोट दक्षिण - दुधनी (कर्नाटक राज्य)
  • मंगळवेढा - कात्राळ-चडचण (कर्नाटक राज्य)
  • मंद्रुप -टाकळी-नांदणी, सादेपूर (कर्नाटक राज्य)

----------

आंतरजिल्हा नाकाबंदी

पोलीस ठाणे नाकाबंदी ठिकाण

  • टेंभुर्णी - भीमानगर (पुणे)
  • अकलूज - सराटी (पुणे)
  • नातेपुते -शिंगणापूरपाटी (सातारा)
  • सोलापूर तालुका - बोरामणी, तामलवाडी (उस्मानाबाद)
  • पांगरी - येडशी, पिंपळवाडी येरमाळा (उस्मानाबाद)
  • करमाळा - जातेगाव (अहमदनगर), कोंढार -चिंचोली-राशीन (अहमदनगर), आवाटी ते परंडा (उस्मानाबाद)
  • माळशिरस - पिलीव, जळभावी घाट (सातारा), सांगोला -जुनोनी, शेरेवाडी-कटफळ, जत ते सानंद (सांगली).
  • मंगळवेढा -सोड्डी-उमदी (सांगली)
  • कुर्डूवाडी - लव्हे ते परंडा, मुंगशी ते परांडा (उस्मानाबाद)
  • वैराग -गौडगाव, धामणगाव ते काटी (उस्मानाबाद)
  • बार्शी तालुका - वारदवाडी (उस्मानाबाद)

------------

प्रत्येक चौकावर असणार विशेष लक्ष

ग्रामीण भागातील बार्शी, पंढरपूर, करमाळा, माढा, अक्कलकोट, मोहोळ, सांगोला, मंगळवेढा आदी मोठ्या शहरातील प्रत्येक महत्त्वाच्या चौकात पोलिसांचा विशेष बंदोबस्त असणार आहे. नियम मोडणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. शिवाय गाडीही जप्त करण्याचे आदेश देण्यात आल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

कोरोनाला हरविण्यासाठी प्रशासनाकडून कडक नाकाबंदीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी कडक संचारबंदीमधील सर्व नियमांचे पालन करावे. अत्यावश्यक सेवेतील लोकांशिवाय कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये. परराज्य व परजिल्ह्यातून येणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. कोरोनाला संपविण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे.

- तेजस्वी सातपुते,

पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस