शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

अंगणात खेळणाऱ्या चिमुकल्यावर भटक्या कुत्र्याचा हल्ला; तुटलेला कान पिशवीत घेऊन पालक इस्पितळात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 15:40 IST

माणकेश्वर गावातील ताहेर बादेला असे या दीड वर्षाच्या बालकाचे नाव असून त्याची आई तुटलेल्या कानासह ताहेरला घेऊन शासकीय इस्पितळात आली होती. 

सोलापूर : येथील बार्शी तालुक्यात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात घराच्या अंगणात खेळणाऱ्या चिमुकल्याला आपले कान गमवावे लागले आहेत. माणकेश्वर गावातील ताहेर बादेला असे या दीड वर्षाच्या बालकाचे नाव असून त्याची आई तुटलेल्या कानासह ताहेरला घेऊन शासकीय इस्पितळात आली होती. 

राज्यभरात भटक्या कुत्र्यांनी धुमाकुळ घातला आहे. ताहेर हा आपल्या अंगणामध्ये खेळत होता. त्याची आई घरकाम करण्यात गुंग होती. एवढ्यात ताहेरच्या जोरजोरात रडण्याचा आवाज तिला ऐकू आला. यामुळे ती हातातील काम टाकून बाहेर आली. अंगणात ताहेरवर भटक्या कुत्र्याने हल्ला केला होता. तिने कुत्र्याला हिसकावून लावले. मात्र, या झटापटीत कुत्र्याने ताहेरचा कान तोडला होता. रक्तबंबाळ झालेल्या ताहेरला तसेच उचलत त्याचा तुटलेला कान घेऊन तिने तात्काळ सरकारी इस्पतळ गाठले. 

तुटलेला कान जोडता येईल या आशेने ताहेरच्या आईने कान आणला होता. मात्र, कान जोडता येणार नसल्याचे डॉक्टरांनी सांगितल्या तिला धक्का बसला आहे. ताहेरच्या चेहऱ्यावर खोल जखमा झाल्याने त्याला आणखी आठवडाभर इस्पितळात ठेवण्यात येणार आहे. तसेच ताहेरच्या कानावर प्लॅस्टीक सर्जरी करता येऊ शकते का याचाही विचार डॉक्टरांकडून सुरु आहे. 

टॅग्स :dogकुत्राSolapurसोलापूर