शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

बदलत्या वस्तींची कहाणी; जगजीवनराम झोपडपट्टीने घडविले तहसीलदारांसह अनेक अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 14:35 IST

काशिनाथ वाघमारे सोलापूर : दोन वेळच्या अन्नासाठी सेंट्रिंगच्या कामावर जाणारी मंडळी बांधकाम व्यावसायिक झाली. रॉकेलच्या दिव्याखाली अभ्यास करणारी मुले तहसीलदार ...

ठळक मुद्देदोन वेळच्या अन्नासाठी सेंट्रिंगच्या कामावर जाणारी मंडळी बांधकाम व्यावसायिक झालीरॉकेलच्या दिव्याखाली अभ्यास करणारी मुले तहसीलदार झालीअस्वच्छतेचा परिसर आता स्वच्छमय परिसर म्हणून ओळखला जाऊ लागला

काशिनाथ वाघमारे

सोलापूर : दोन वेळच्या अन्नासाठी सेंट्रिंगच्या कामावर जाणारी मंडळी बांधकाम व्यावसायिक झाली. रॉकेलच्या दिव्याखाली अभ्यास करणारी मुले तहसीलदार झाली. कोणीही जवळ केले नाही, पण राजकारणी झाले. आज पत्र्यांच्या घरांचाही कायापालट झाला आहे.  अस्वच्छतेचा परिसर आता स्वच्छमय परिसर म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.

मोदी असे त्या परिसराचे नाव़ १२ हजार लोकसंख्येच्या या वस्तीमध्ये बांधकाम व्यावसायिक, तहसीलदारासह अनेक नगरसेवकही घडले़ शिवाजी चौक, शामा नगर, नृसिंह नगर, कस्तुरबा नगर असे अनेक नगर या मोदी परिसरात मोडतात़ पाच हजारांवरची लोकवस्ती आज जवळपास १२ हजारांवर गेली आहे़ या परिसराने आता आपली ओळखही बदलली आहे़ अशिक्षितांची सोसायटी आता शिक्षित वर्गाची वसाहत म्हणून ओळखली जाऊ लागली़ पत्रकार भवन - मोदी पोलीस चौकी रस्त्याने मोदी परिसराचे दोन भाग केले़ मोदी परिसरात राहणाºया मोची समाजाने आता आपली ओळख बदलली आहे़ मोलमजुरीच्या शोधात कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून आलेल्या लोकांना मोदी परिसराचा आधार लाभला.

या लोकांना सुरुवातीला अवतीभोवतीच्या जुन्या मिलमध्ये काम मिळाले़ मिल बंद पडल्यानंतर ते बांधकम क्षेत्रात मजुरीसाठी वळाले़ या परिसराला साहित्य, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे़ काही साहित्यिकही या परिसरातून घडले आहेत़

...अन् नामकरण झाले- १९७१-७२ चा काऴ दुष्काळी स्थितीत आपल्या समाजबांधवांची स्थिती पाहावी म्हणून माजी उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम यांनी मोदी परिसराचा दौरा केला़ पहिल्यांदाच मोची समाजातील मोठ्या व्यक्तीचा या झोपडपट्टीला पदस्पर्श झाला़ समाजातील नागरिकांनी मोठी गर्दी केली़ त्यांच्याकडूनच या झोपडपट्टीला ‘बाबू जगजीवनराम झोपडपट्टी’ असे नामकरण झाले़ अलीकडे या मोठ्या रस्त्याने मोदी परिसराचे दोन भाग झाले़ न्यू जगजीवनराम झोपडपट्टीत इंदिरा आवास योजनेतून शंभर घरे बांधली गेली आणि याच्या उद्घाटनासाठी लोकसभेच्या माजी सभापती मीरा कुमारी यांच्या कन्या येऊन गेल्या़

तहसीलदार ते स्थायी समिती सभापती- या परिसरातून अनेक मोठ्या व्यक्ती घडल्या. तहसीलदार रामलिंग कवडे, माजी महिला तहसीलदार साबळे यांच्यासह स्थायी समितीचे तत्कालीन सभापती सुंदरलाल कमलापुरे, नगरसेवक नागनाथ वाघमारे, डॉ़ बंगरगी, आशा म्हेत्रे, मीनाक्षी कंपली, नरसिंग क ोळी अशी राजकारणी लोकं घडली. याबरोबरच शिक्षण क्षेत्रातून प्रा़ विष्णू विटेकर, प्रा़ रेवणसिद्ध विटेकर आणि आता प्राध्यापिका ज्योती वाघमारे अशी नवीपिढी घडली आहे.

एकेकाळी बांधकाम करणारे काही लोक आज बांधकाम व्यावसायिक झाले, असंख्य मजुरांना रोजगारही दिला़ सिद्राम म्हेत्रे, संजय म्हेत्रे, शंकर म्हेत्रे असे बांधकाम व्यावसायिक एकेकाळी मोलमजुरीच्या शोधात होते़ तसेच लेप्रसीचे वैद्यकीय तज्ज्ञ डॉ़ दिन्नी, महापालिका अधिकारी रामचंद्र आसादेंसह अनेक लोक शिक्षणाच्या बळावर घडले़ उद्योजक बाबुराव म्हेत्रे यांनी चिंंचोळी एमआयडीसीत आज उद्योग थाटला आहे़ काँग्रेसकडून सुंदरलाल कमलापुरे यांनी विधानसभेची निवडणूकही लढवली होती़ याबरोबरच या परिसरातील अनेक लोक महापालिकेत काम करताहेत़ काही मुले इंजिनियर झाली आहेत़ 

अस्वच्छतेचा परिसर झाला स्वच्छमय - साधारण ९० वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या या वसाहतीला कोणत्याच मूलभूत सोयीसुविधा नव्हत्या़ झोपडपट्टी असल्याच्या करणास्तव वीज, पाणीही कायमस्वरूपी दिले जात नव्हते़ कुठे एका चौकात आजही पाच कंदील पाहायला मिळतो़ ही ओळख अजून पुसलेली नाही़ महापालिकेने काही सेवासुविधा दिल्या, अंतर्गत रस्ते झाले़ 

टॅग्स :SolapurसोलापूरLokmat Eventलोकमत इव्हेंट