शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

गतवैभव पाहण्यासाठी पावले वळतात उजनी काठाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:23 IST

करमाळा : उजनी पाणलोट क्षेत्रामुळे या परिसरातील गतवैभव असलेल्या वास्तू लुप्त झाल्या. विस्ताराने मोठ्या असलेल्या उजनीचे पाणी कमी होताच ...

करमाळा : उजनी पाणलोट क्षेत्रामुळे या परिसरातील गतवैभव असलेल्या वास्तू लुप्त झाल्या. विस्ताराने मोठ्या असलेल्या उजनीचे पाणी कमी होताच इतिहासाची पाने चाळल्याप्रमाणे या परिसराचा आनंद लुटण्यासाठी अनेकांची पावले इकडे वळतात. हा परिसर अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची चळवळ उभारायला हवी, असा मतप्रवाह सध्या व्यक्त होऊ लागला आहे.

विस्तार मोठा असल्याच्या पार्श्वभूमीवर उजनीच्या पाण्याखाली गेलेल्या गावातील अनेक वास्तू पाण्यात लुप्त झाल्या. त्यातील काही पाण्याबाहेर आल्यावर करमाळा तालुक्यातील कुगावचा भव्य-दिव्य असा तत्कालीन इनामदार वाडा, वांगी नं. ३ इथलं श्री शारदाभवानी माता मंदिर, इंदापूर तालुक्यातले पळसदेव येथील प्राचीन महादेव मंदिर ही ठिकाणं पर्यटकांच्या आकर्षणाची केंद्रे ठरली आहेत. हे गतवैभव पाहण्याची संधी उपलब्ध होते. सुटीच्या काळात सहकुटुंब पहावी, अशी एक दिवसाची सहल होत असल्याने अनेकांची पावले हमखास उजनी काठाकडे वळतात.

कुगावचा प्राचीन इनामदार वाडा

काय पहाल?

देवराव, जिजाबा, नागोबा या इनामदार बंधूंनी साधारणतः चारशे वर्षांपूर्वी भीमा नदीच्या तीरावर बांधलेला सध्या उजनीच्या पाण्याने वेढलेला भव्य-दिव्य असा वाडा कुगाव (ता. करमाळा) येथे आहे. सध्या मोठ्या प्रमाणात पडझड झाली असली तरीही मुख्य दरवाजा, एक बुरुज, तत्कालीन वाड्याच्या आतील विहीर, मजबूत दगडी तटबंदी आदींसह प्रवेशद्वारानजीकचा कमानींचा भाग पाहता येतो. वाड्याची दगडीरचना अतिशय आकर्षक असून, येथेच सैराट या चित्रपटाचे चित्रीकरणही झालेले आहे. उजनी भरल्यानंतर हा वाडा पूर्णपणे पाण्याखाली झाकला जातो.

पळसदेवचे प्राचीन महादेव मंदिर

इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील प्राचीन मंदिराचे शिखर, सभागृह, तटबंदी, ओवऱ्या आदींसह सात थरांचे आकर्षक शिखर हे मंदिराचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. तत्कालीन उत्कृष्ट शिल्पकलेची साक्ष देणारे रेखीव दगड मंदिर बांधणीत आढळतात. मुख्य गाभारा अजूनही ‘जैसे थे’ आहे. या मंदिराची निर्मिती मध्ययुगीन असल्याचे सांगण्यात येते. करमाळा तालुक्यातील वांगी नं. ३ येथील श्री शारदाभवानी मातेचे उजनीच्या पाण्यात गडप झालेले मंदिर पाणी कमी झाल्यावर त्याची बांधणी लक्षात येते.

----------------------