शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
4
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
5
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
6
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
7
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
8
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
10
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
11
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
12
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
14
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
15
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
16
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
17
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
18
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
19
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
20
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी

तरुणाईची पावले कॉन्टीनमधून ग्रंथालयाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 12:18 IST

महाविद्यालयीन विद्यार्थी परीक्षेच्या तयारीकडे : परीक्षा, प्रोजेक्टच्या तयारीत गुंतली मुले

ठळक मुद्देमहाविद्यालयीन परीक्षेपेक्षा आता स्पर्धा परीक्षेला जास्त महत्त्व फेब्रुवारी महिना संपत आल्यानंतर सर्वांना परीक्षा तोंडावर आल्याचे कळतनोट्स, अभ्यास पूर्ण करण्यासाठी आमची धावपळ सुरू

रूपेश हेळवे सोलापूर : नवीन वर्ष सुरू झाले आणि बघता बघता फेब्रुवारी महिनाही संपत आला़ एका महिन्यावर परीक्षा येऊन ठेपल्यामुळे आता कॉन्टीनमध्ये एंजॉय करणाºया तरुणाईची पावले आता हळूहळू ग्रंथालयाकडे वळू लागली आहेत़ याचबरोबर कोर्सचे प्रोजेक्ट, फाईल्स, जनरल, डेझरटेशन पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ होत आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून महाविद्यालयातील गं्रथालयामध्ये अनेक रिकामे बेंच दिसत होते़ आता सकाळी लवकर येऊन ग्रंथालयात बसणाºया विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे़ याचबरोबर अधून-मधून कॉलेजला दांड्या मारणारे विद्यार्थी मात्र अजूनही इतर मित्रांचे नोट्स मिळतील का किंवा त्याच्या झेरॉक्स मिळतील का, या विचारात पडले आहेत़ यातीलच काही विद्यार्थ्यांशी ‘लोकमत’ने संवाद साधून त्यांचे मत जाणून घेतले.

फेब्रुवारी महिना संपत आल्यानंतर सर्वांना परीक्षा तोंडावर आल्याचे कळत आहे़ यामुळे राहिलेल्या नोट्स, अभ्यास पूर्ण करण्यासाठी आमची धावपळ सुरू आहे़ याचबरोबर परीक्षा फॉर्म भरणे, ट्रीपला जाणे यामध्ये आम्ही गुंतलेलो आहोत़ - पद्मश्री कुलकर्णी, विद्यार्थिनी 

परीक्षा जवळ आल्यामुळे अभ्यासाचा ताण वाढत आहे़ यामुळे अभ्यासाचे मॅनेजमेंट कोलमडत आहे़ याचबरोबर प्रेझेंटेशन पूर्ण करण्यासाठी वेळ खूप कमी पडत आहे़ याचबरोबर ट्रीप जात आहे़ यामुळे त्यातही आणखी वेळ कमी मिळणाऱ- स्मिता गदगे

परीक्षा जवळ आल्यानंतरच आमचा अभ्यास होतो़ यामुळे आता आम्हाला अभ्यासाची ओढ लागत आहे़ याचबरोबर थोडे तणावही वाढत आहे़ यामुळे दररोज थोडा-थोडा अभ्यासही सुरू आहे़ - श्रीनिवास हिबारे

आता फक्त परीक्षेचेच टेन्शन आले आहे़ परीक्षेच्या टेन्शनमध्ये अभ्यासाकडेही लक्ष लागत नाही़ याच सोबत प्रोजेक्टही पूर्ण करण्यासाठी अर्धी रात्र जागून काढावी लागत आहे आणि दिवसभर ग्रंथालयात वेळ घालावे लागत आहे़ - पौर्णिमा शिंदे

आता पदवी परीक्षा तर पास झालो़ पण पदवीपेक्षा आता नोकरीच्या शोधासाठी पुढील शिक्षण घेत स्पर्धा परीक्षेच्या तयारीकडे लक्ष आहे़ याचबरोबर आता कॉलेजचे प्रोजेक्ट करण्यासाठीही ओढाताण होत आहे़ पण नियोजनामुळे जास्त त्रास होत नाही़ - वैभव आठवले

परीक्षा हे शब्द जरी कानावर पडले की, आमची धावपळ होत आहे़ यामुळे अभ्यासासाठी दिवस-रात्र एक करत आहोत़ सध्या आमची हालत म्हणजे सहा महिन्यांचा अभ्यासक्रम तीन तासात दाखवल्या जाणाºया चित्रपटासारखी झाली आहे़ वेळ कमी पडत असल्यामुळे ग्रंथालयात जास्त वेळ घालवत आहोत़ - नागेश पवार 

महाविद्यालयीन परीक्षेपेक्षा आता स्पर्धा परीक्षेला जास्त महत्त्व मी देत आहे़ यामुळे टक्केवारीपेक्षा नोकरी मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे़ यामुळे ग्रंथालयामध्ये पूर्ण वेळ घालवत आहोत़ - जयप्रकाश सर्दनकर 

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणcollegeमहाविद्यालयexamपरीक्षा