आई जमीन नावावर करत नाही म्हणून सावत्र मुलाने केली तिची हत्या, सोलापुरातील धक्कादायक घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 06:38 PM2017-10-21T18:38:39+5:302017-10-21T18:57:08+5:30

जमीन नावावर करत नाही म्हणून आईच्या डोक्यावर कोयत्याने लोखंडी हत्याराने वार करुन  सावत्र मुलांनी शुक्रवारी रात्री केवड येथे राहत्या घरासमोर तिचा खून केला़ ही घटना केवड (ता़ माढा) येथे घडली़ 

The step son killed his mother, the incident in Solapur district, settled the dispute over the land | आई जमीन नावावर करत नाही म्हणून सावत्र मुलाने केली तिची हत्या, सोलापुरातील धक्कादायक घटना

आई जमीन नावावर करत नाही म्हणून सावत्र मुलाने केली तिची हत्या, सोलापुरातील धक्कादायक घटना

Next

आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर/माढा - जमीन नावावर करत नाही म्हणून आईच्या डोक्यावर कोयत्याने लोखंडी हत्याराने वार करुन  सावत्र मुलांनी शुक्रवारी रात्री केवड येथे राहत्या घरासमोर तिचा खून केला़ ही घटना केवड (ता़ माढा) येथे घडली. राजाबाई उर्फ राणी हरिश्चं़द्र पवार असे खून झालेल्या आईचे नाव आहे़ याबाबतची फिर्याद कमलाबाई रमेश काळे (रा डोणज ता मंगळवेढा) हिने माढा पोलीस ठाण्यात दिली़  याप्रकरणी राहुल पवार व कृष्णा पवार या दोघांना ताब्यात घेतले आहे़ ही घटना समजताच पोलिस उपविभागीय अधिकारी विजय कबाडे यांनी व माढा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल भोस यांनी घटनास्थळी भेट दिली आहे़
 हरिश्चंद्र मनसुख पवार याच्याबरोबर राजाबाई उर्फ राणी पवार यांचे लग्न झाले होते़ हरिश्ंद्र पवार याची ही दुसरी पत्नीस आहे पहीली पत्नी सुशिला ही मयत झाल्यावर दुसरी केली  असुन केवड गावात हे कुटूंब राहत आहे़ दुसरी पत्नी राणी उर्फ राजाबाई हिच्या नावे कुवड येथे पाच एकर व जामगाव येथे दोन एकर जमीन आहे़ ही जमीन आमच्या नावावर कर म्हणुन रागाच्या भरात मुलानी आईचा खुन केला़
या प्रकरणी समीर हरिश्चंद्र पवार,राजेंद्र हरिश्चंद्र पवार,गणेश हरिश्चंद्र पवार,लक्ष्मी हरिशचंद्र पवार या तिघां सावत्र मुलासह व एक सावत्र मुलगी अशा चौघांविरोधात माढा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सावत्र मुलगा राहुल पवार याची बायको ही मयत राजाबाई पवार यांनी पळवुन लावल्याच्या संशयावरुन हा खून केल्याचे फियादीत नमुद केले आहे.
शुक्रवारी रात्री  आठ वाजता  राजाबाई उर्फ राणी  पवार या आपल्या कुटूबिंयासह घराच्या बाहेर अंगणातील उजेडात बोलत बसल्या होत्या. अचानक राजाबाई पवार यांच्या घरासमोर येऊन तु आमच्या नावावर जमीन का केली नाही, तु राहुल पवारची बायको का पळवुन लावली असे म्हणत या चोघांनी आईच्या डोक्यावर, मानेवर कोयत्याने वार करुन तिचा खून केला़ या चौघांना अडविण्याचा प्रयत्न केला असता मयत मुलीची आई कमलाबाई काळे व मुलगी लक्ष्मी पवार,हिम्मत शिंदे या तिघांना मारहाण करण्यात आली. लक्ष्मी पवार हिच्या हातावर एक वार केला गेला आहे़ राहुल पवार व कृष्णा पवार या दोघांना माढा पोलिसांनी अटक केली असुन वसंत पवार व फुलाबाई पवार हे दोघे फरार आहेत. माढा पोलिस त्याचा तपास करीत आहेत. माढा ग्रामीण रुग्णालयात मयत राजाबाई पवार यांचे शवविच्छेदन शनिवारी करुन प्रेत ताब्यात दिले आहे़

Web Title: The step son killed his mother, the incident in Solapur district, settled the dispute over the land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून